Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed News : बीडमध्ये मनाई आदेश लागू, ५ पेक्षा अधिकजण जमल्यास होणार कारवाई

Beed Curfew News : विना परवानगी पाच पेक्षा अधिक जण जमल्यास होणार कारवाई, अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी आदेश काढले आहेत.

Namdeo Kumbhar

Beed Latest News Marathi : बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, आजपासून जिल्ह्यात मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हा मनाई आदेश जारी केला आहे. हा आदेश 14 नोव्हेंबरपर्यंत लागू असणार आहे.

सध्या निवडणूक कालावधी असून, किरकोळ कारणावरून तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळं जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी मनाई आदेश काढला आहे. त्यासाठीची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

कोणत्या कृत्यांना मनाई, नेमका आदेश काय?

- शस्त्रे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगता येणार नाहीत. काठ्या, लाठ्या, शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तू जवळ ठेवता येणार नाहीत.

- कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगता येणार नाहीत. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा फोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधणे गोळा करून ठेवता येणार नाहीत किंवा बाळगता किवा तयार करता येणार नाहीत.

- आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करता येणार नाहीत. सभ्यता, नीतिमत्तेस बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू जवळ ठेवता येणार नाहीत.

- जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मूल्यांच्या विरुद्ध असेल किवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहोचवणारी असेल तर ते कृत्य करता येणार नाही.

- सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहोचवणारी, जाहीरपणे प्रक्षोभक भाषणे व असभ्य वर्तन करता येणार नाही. व्यक्तींच्या किंवा शवांच्या किवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणार नाहीत.

- पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावाला परवानगीशिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणूक, मोर्चा काढता येणार नाही. आदेशानुसार पालन होते की नाही यावर पोलीस व प्रशासनाची नजर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT