Beed Crime Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime : बीडमध्ये गुंडाराज! बैल शेतात गेला म्हणून शेतकरी महिलेला अमानुष मारहाण, जाब विचारणाऱ्या भावांनाही चोपलं; Video

Beed News : बीडमध्ये एका महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली. महिलेचा बैल शेजारच्या शेतात गेल्याने तिला मारहाण झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

  • बीडमधील धक्कादायक प्रकार समोर

  • बैल शेतात गेल्याने महिलेला अमानुष मारहाण

  • जाब विचारणाऱ्या भावांवरही झाला हल्ला

  • महिलेला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

Beed : बीडमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. दररोज हाणामारी, मारहाण असे प्रकार बीडमधून समोर येत आहेत. आता अशीच एक मारहाणीची घटना बीडच्या गोविंदवाडी येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. बैल शेतात आल्याने एका शेतकरी महिलेचा अमानुष मारहाण करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी येथे हा प्रकार घडला आहे. शेतकरी महिलेचा बैल चरत असताना चुकून शेजाऱ्यांच्या शेतामध्ये गेला. बैल शेतात आल्याचा शेजाऱ्यांना भयंकर राग आला. या रागात चार ते पाच जणांनी शेतकरी महिलेला अमानुष मारहाण केली. शुल्लक कारणामुळे महिलेला झालेल्या मारहाणीमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

बीडमधील या घटनेमुळे माणुसकीला काळीमा फासल्याचे म्हटले जात आहे. बैल शेतात आला म्हणून एका महिलेला मारहाण करण्यात आली. बहिणीला मारहाण का केली असा जाब विचारणाऱ्या पीडितेच्या दोन्ही भावांवर देखील हल्ला करण्यात आला. हल्ल्यामुळे दोन्ही भाऊ गंभीर जखमी असून त्यांच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बीडमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काहीजण एका महिलेला मारहाण करत असल्याचे पाहायला मिळते. महिलेचा बैल चरताना शेतात गेल्याने तिला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या भावांनाही मार देण्यात आला. या प्रकरणी गेवराई पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Govt Scheme: पहिल्या बाळाच्या जन्मावर ५०००, दुसऱ्यावेळी मुलगी झाली तर मिळतील ६ हजार रुपये; काय आहे सरकारची योजना?

Vaishnavi Kalyankar: 'देवमाणूस'च्या खऱ्या बायकोचा नऊवारीतील मनमोहक लूक पाहिलातं का?

Maharashtra Politics: तयारीला लागा! उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, पण मनसेसोबतच्या युतीबाबत सस्पेन्स

Raksha Bandhan 2025: बायकोने नवऱ्याला राखी बांधावी की नाही?

भाजपात बंपर इनकमिंग! काँग्रेस अन् शिवसेनेला खिंडार; बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते भाजपवासी

SCROLL FOR NEXT