Beed Crime Saam Tv
महाराष्ट्र

Beed: पोलीस दलात खळबळ! निलंबित पोलीस निरिक्षकानं आयुष्य संपवलं, घरात कुणीही नसताना उचललं टोकाचं पाऊल

Beed Police Crime: निलंबित पोलीस निरिक्षक सुनील नागरगोजे यांनी आत्महत्या केली आहे. अंबाजोगाई शहरातील भाड्याच्या खोलीत त्यांनी आयुष्य संपवलं. सोमवारी रात्री ही घटना उघडकीस आली.

Bhagyashree Kamble

  • निलंबित पोलीस निरिक्षक सुनील नागरगोजे यांनी आत्महत्या केली.

  • अंबाजोगाई शहरातील भाड्याच्या खोलीत आयुष्य संपवलं.

  • सोमवारी रात्री ही घटना उघडकीस आली.

बीडच्या पोलीस दलातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. निलंबित पोलीस निरिक्षक सुनील नागरगोजे यांनी आत्महत्या केली आहे. अंबाजोगाई शहरातील भाड्याच्या खोलीत त्यांनी आयुष्य संपवलं. सोमवारी रात्री ही घटना उघडकीस आली. त्यांनी आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर पोलीस दलासह परिसरात खळबळ उडाली आहे.

सुनील नागरगोजे (वय वर्ष ५७) असे मृत निलंबित पोलीस निरिक्षकाचे नाव आहे. नागरगोजे हे मूळ परळी तालुक्यातील नागदरा येथील रहिवासी होते. अनेक वर्षांच्या सेवेनंतर मागील काही महिन्यांपूर्वी ते नोकरीतून बाहेर पडले होते. नुकतेच त्यांनी अंबाजोगाई येथील घर बांधकामासाठी पडल्याने ते प्रशांत नगर येथे भाड्याने राहत होते.

घटनेच्या दिवशी त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भाड्याच्या घरात कुणीही नसताना सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेत घटनेचा पंचनामा केला.

त्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह रूग्णालयात पाठवले. दरम्यान, पोलिसांनी घराची तपासणी केली असता, काही सापडले नाही. नागरगोजे यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अंबाजोगाई पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. निलंबित पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांच्या आत्महत्येने पोलीस दलात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. त्यांनी आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange patil protest live updates: ५८ लाख नोंदीचा रेकॉर्ड ग्रामपंचायतमध्ये लावण्याच्या मागणीला मान्यता- मनोज जरांगे पाटील

Police Fullform: पोलिस या शब्दाचा अर्थ काय?

Malvan Tourism : मालवणजवळील Top 5 स्पॉट्स; समुद्रकिनारे, किल्ले आणि आकर्षणे

Maratha Reservation: या ताटातलं काढून त्या ताटात द्या हे... चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Tourism: लोणावळा-खंडाळा विसरून जाल! कर्जतजवळ असलेल्या 'या' जागेवर फिरून याच

SCROLL FOR NEXT