Beed Crime Satish Bhosale Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime : सतीश भोसलेने ढाकणे बापलेकांना मारहाण का केली? गावकऱ्यांनी सांगितला घटनाक्रम

Beed News : सतीश भोसले याने दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे या बापलेकाला मारहाण केली होती. भोसले यांनी त्यांना मारहाण का केली? याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. त्यांनी भोसलेसह धस यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

Yash Shirke

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

Beed Crime News : बीडमध्ये सतीश भोसले याने ढाकणे बापलेकाला मारहाण केली. मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. यावरुन सतीश भोसलेवर कारवाई व्हावी अशी मागणी व्हायला सुरुवात झाली. अशातच भोसलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणावर बावी गावच्या ग्रामस्थांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बावी गावात हा मारहाणीचा प्रकार घडला. या गावच्या ग्रामस्थांनी मारहाणीवरुन संताप व्यक्त केला आहे. ग्रामस्थांनी मारहाण का झाली याबाबत माहिती दिली आहे. सतीश भोसलेवर गुन्हा दाखल झाला, आता त्याचा आका सुरेश धस यांच्यावरही कारवाई करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान हा मारहाणीचा प्रकार कोणत्या कारणांमुळे झाला हे ग्रामस्थांनी सांगितले.

'सतीश भोसले हा दिलीप ढाकणे यांच्या शेतामध्ये हरण पकडण्यासाठी आला होता. १९ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती. दिलीप ढाकणे यांनी सतीश भोसले आणि त्याच्या सहकार्यांना हरण पकडण्यास मनाई केली. यावरुन भोसले आणि सहकाऱ्यांनी दिलीप यांना बेदम मारहणा केली. यात दिलीप यांचे आठ ते नऊ दात पडले', अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

'त्यानंतर महेश ढाकणे यालाही सतीश भोसलेने बॅटने बेदम मारहाण केली. यात त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले असता त्यांना तिथून हाकलून दिले. या घटनेला पंधरा दिवस झाले मात्र गुन्हा दाखल झाला नव्हता. ज्या वेळेस सोशल माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा पोलिसांनी याची दखल घेतली', असे बावी गावच्या ग्रामस्थांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पिपाणी गेली, तुतारी राहिली! शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आयोगाचा दिलासा

Maharashtra Live News Update: अक्कलकोटचे माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांचे निधन

Pune Land Scam: पुण्यात पुन्हा जमीन घोटाळा? 750 कोटींच्या जमिनीची 33 कोटीत विक्री

Pune Accident: १२ गाड्यांचा चक्काचूर, ८ जणांचा मृत्यू; पुण्यातील नवले पुलावरील कंटेनरचा अपघात नेमका कसा घडला?

Bihar Election Result: बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार? उमेदवारांची धाकधूक वाढली, कुठे पाहाल निकाल?

SCROLL FOR NEXT