Beed Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: बीड जिल्हा पुन्हा हादरला, २ सख्ख्या भावांची निर्घृण हत्या, नेमकं काय घडलं?

2 Brothers Killed In Beed: संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून चर्चेत असलेल्या बीडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बीड पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

Priya More

विनोद जिरे, बीड

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण ताजे असतानाच बीड जिल्हा पुन्हा हादरला आहे. बीडमध्ये दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आष्टी तालुक्यात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतले आहे. हत्ये मागचे कारण अस्पष्ट आहे. बीड पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यामधील वाहिरा परिसरात दोन सख्ख्या भावाची निर्घृण हत्या करण्यात आली. अजय भोसले (३० वर्षे) आणि भरत भोसले (३२ वर्षे) अशी हत्या झालेल्या सख्ख्या भावांची नावं आहेत. हे दोघे भाऊ बीड-नगर हद्दीवरील आष्टी तालुक्यातील हातवळण या मूळ गावचे रहिवासी होते.

हातवळण गावापासून ५ किलोमीटर अंतरावर वाहीरा गावच्या परिसरात या दोघांची हत्या करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आष्टी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या प्रकरणी संशयित चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या हत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेच्या स्कूल ठीक करो अभियानाच्या पाहणी दरम्यान विद्यार्थी शाळेत कचरा काढताना निदर्शनास

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT