Beed Crime Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime : चालताना धक्का लागल्याने झाला इगो हर्ट; मित्रांना बोलावत विद्यार्थ्याला बेदम मारहाण, शाळेतच घातला गोंधळ

Beed News : अगदी क्षुल्लक कारणातून हमरीतुमरीवर उतरत आहेत. असाच प्रकार बीड शहरातील एका शाळेत घडला असून शाळेतील नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या टोळक्याने एकाला बेदम मारहाण

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये देखील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे बीडमध्ये घडलेल्या प्रकारावरून पाहण्यास मिळाले. यात वर्गात जाताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणातून टोळक्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मुलाला मारहाण होत असताना त्याचा चुलत भाऊ वाचविण्यासाठी आला असता त्याच्या देखील डोक्यात वार करून जखमी करण्यात आले आहे. 

बीड जिल्ह्यात रोज कुठे ना कुठे मारहाण, खुनाच्या घटना घडत आहे. यामुळे पोलीस प्रशासनाचा धाक संपला का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. अगदी क्षुल्लक कारणातून हमरीतुमरीवर उतरत आहेत. असाच प्रकार बीड शहरातील एका शाळेत घडला असून शाळेतील नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या टोळक्याने एकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. 

धक्का लागल्याने मित्रांना बोलावत केली मारहाण 

दरम्यान वर्गात जात असताना एकाला विद्यार्थ्यांचा धक्का लागला. यामुळे त्या विद्यार्थ्याने माफी देखील मागितली. मात्र या किरकोळ कारणावरुन नववीच्या विद्यार्थ्याचा इगो हर्ट झाला. यातून त्याने आपल्याच वर्गातील विद्यार्थ्याला मारण्यासाठी गल्लीतील १० ते १५ मित्रांना बोलावून घेतले. संबंधितांनी फायटर आणि रॉडने विद्यार्थ्याला मारहाण केली. यावेळी मारहाण होत असलेल्या मुलाचा चुलत भाऊ त्याला वाचवण्यासाठी आल्यावर संशयितांनी त्याचे देखील डोके फोडले. 

बचावासाठी स्टाफ रूममध्ये पळाले 

मुलांकडून बेदम मारहाण होत असल्याने दोघे जण वाचण्यासाठी शिक्षकांच्या स्टाफ रुम मध्ये पळाले. मात्र टोळक्याने तिथेही जाऊन धुडगूस घातला. बीडच्या एका विद्यालयात हा सर्व प्रकार घडण्याचे समोर आले आहे. या घटनेत दोन विद्यार्थी जखमी झाले असून याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर महापालिका सभागृहात स्वीकृत सदस्य निवडीवरून गोंधळ

T20 World Cup 2026: पाकिस्तानी खेळाडू म्हणतो, भारत सेमीफायनलपर्यंत जाणारच नाही; कारणंही सांगितलं

शरद पवार पुन्हा खासदार होणार का? संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले...

Health Care: जेवताना की जेवल्यानंतर नेमकं कधी पाणी प्यावं?

Skin Care : तांदूळ आणि बटाट्यापासून बनवा 'हे' घरगुती फेस मास्क, मिनटांतच त्वचा दिसेल ग्लोइंग

SCROLL FOR NEXT