Beed Kaij Taluka Crime News Saam TV
महाराष्ट्र

खळबळजनक! कला केंद्राच्या नावाखाली सुरू होता वेश्या व्यवसाय; ठाकरे गटाच्या बड्या नेत्यासह 36 जणांवर गुन्हा

Beed Crime News: ठाकरे गटाच्या बड्या नेत्याच्या वरदहस्ताने बीडमध्ये कला केंद्राच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

विनोद जिरे

Beed Crime News: एकीकडे राज्याच्या राजकारणात उलथापालथ सुरू असतांना दुसरीकडे बीडमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ठाकरे गटाच्या बड्या नेत्याच्या वरदहस्ताने बीडमध्ये कला केंद्राच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी कला केंद्रावर छापा टाकून ५ अल्पवयीन मुलींसह काही महिलांची सुटका केली आहे.

आयपीएस पंकज कुमावत यांच्यासह टीमने या सर्व प्रकाराचा पर्दाफाश केला असून याप्रकरणात 36 जणांविरोधात गुन्हा दाखल (Crime News) करण्यात आला आहे. रत्नाकर शिंदे असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी असल्याचं सांगितलं जात आहे.

बीडच्या केज तालुक्यात (Beed News) असणाऱ्या उमरी येथील महालक्ष्मी कलाकेंद्रावर हा सर्व प्रकार सुरू असल्याचं पोलीस कारवाईत समोर आलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे हे तिथं होते मात्र लगेच पळून गेले, अशी माहिती देखील पोलिसी खबर्यामार्फत मिळाल्याचं एफआयआरमध्ये नमूद आहे.

मात्र त्यानंतर या कलाकेंद्राच्या अड्ड्यावर जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांची स्कॉर्पिओ आणि इनोव्हा दोन्ही गाड्या मिळून आल्या आहेत. या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या केज तालुक्यातील उमरी गावात कलाकेंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार पोलिसांना (Police) प्राप्त झाली होती. तक्रार दाखल होताच आयपीएस पंकज कुमावत यांच्यासह सपोनि सुरेखा धस यांच्या पथकाने या ठिकाणी छापा मारला.

यावेळी डीजेच्या तालावर रात्री 2 वाजता काही महिला, मुली नाचत असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर या ठिकाणी दारू, गुटखा, वापरलेले कंडोम देखील आढळून आले आहेत. पोलिसांनी येथील महिला, मुलींचा जबाब घेतला असता त्यामध्ये 12 वर्ष 9 महिन्याची असणाऱ्या अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याचं उघडकीस आलं.

या केलेल्या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या 1 पीडित अल्पवयीन मुलीसह पाच अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. तर याप्रकरणी उबाठा जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदेंसह 36 जणांवर बीडच्या केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT