Beed Crime news Saam Tv Marathi
महाराष्ट्र

बीडमध्ये भयंकर घडलं; ग्रामपंचायत शिपायाला काळंनिळं होईपर्यंत मारलं, महिलेची छेड काढल्याचा आरोप

Beed Crime news: बीडच्या गेवराई तालुक्यातील नांदगाव येथे ग्रामपंचायत शिपाईला अमानुष मारहाण. लाकडी दांडे, रॉडने जबर मारहाण.. एक पाय फ्रॅक्चर... बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.

Bhagyashree Kamble

बीडमध्ये गुम्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असताना आणखी एका एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. नांदगाव येथील ग्रामपंचायत शिपाईला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आठ ते दहा जणांनी मिळून त्यांच्यावर लाकडी दांडे आणि रॉडने हल्ला केला. त्यांची प्रकृती गंभीर असून, पोलीस आता आरोपींवर काय कारवाई करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

प्राथमिक माहितीनुसार, जालिंदर सुरवसे असे नांदलगाव येथील ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. महिलेची छेड काढल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर अमानुष मारहाण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. याची माहिती मिळताच आठ ते दहा जणांनी मिळून त्यांच्यावर हल्ला चढवला.

आरोपींनी सुरवसे यांच्यावर लाकडी दांडे आणि रॉडने वार केले. या हल्ल्यात सुरवसे गंभीर जखमी झाले. काळंनिळं होईपर्यंत त्यांना मारलं. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचा एक पाय फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती आहे. पोलिसांनी सुरवसे यांची तक्रार नोंदवून घेतली.

सुरवसे यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. दरम्यान मारहाण करणाऱ्या व्यक्तींपासून आपल्याला धोका असल्याचे देखील सुरवसे आणि त्यांच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे. या प्रकरणात आता पोलीस काय कारवाई करणार? याकडे सर्वांचेच लक्ष आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT