Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed : मुलीचे अपहरण; वीस दिवसांपासून तपास लागेना, पोलिसांकडून तपास केला जात नसल्याचे नातेवाईकांचा आरोप

Beed News : मुलगी आज येईल, उद्या येईल असे पोलीसांकडून उत्तर दिले जात असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. राजकीय दबाव असल्यामुळे पोलीस कार्यवाही करत नाहीत; असा आरोप देखील मुलीच्या आई-वडिलांनी केला

Rajesh Sonwane

योगेश काशीद 

बीड : आष्टी तालुक्यातील हिवरा या गावातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलींला फूस लावून तिचे अपहरण करण्यात आले आहे. साधारण वीस दिवसांपासून हि मुलगी गायब असताना देखील स्थानिक पोलीस राजकीय दबावापोटी कारवाई कोणतीही करत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर आज मुलीच्या आई- वडिलांसह नातेवाईकांची पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेत यासंदर्भात निवेदन दिले आहे. 

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या अंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील हिवरा या गावात सदरची घटना घडली आहे. हिवरा येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करत मुलीला फुस लावत गायब करण्यात आले आहे. या प्रकरणी मुलीच्या आई- वडिलांनी पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे. मात्र गेल्या वीस दिवसांपासून मुलगी कुठे आहे? याचा तपास अद्याप लागलेला नाही. यामुळे मुलीचे नातेवाईक चिंतेत आहेत.

आई- वडिलांचा गंभीर आरोप 

दरम्यान तक्रार दिल्यानंतर तपास धीम्या गतीने होत असल्याने आम्ही पोलीस स्टेशनला गेलो असता मुलगी आज येईल, उद्या येईल असे स्थानिक पोलीसांकडून उत्तर दिले जात असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. राजकीय दबाव असल्यामुळे पोलीस कार्यवाही करत नाहीत; असा आरोप देखील संबंधित मुलीच्या आई-वडिलांनी केला आहे. 

निवेदन देत दिला उपोषणाचा इशारा 

तर आमची मुलगी कुठे आहे; आहे का नाही? हे आम्हाला माहीत नाही. म्हणून आमच्या मुलीचा शोध लावावा व मुलगी कुठे आहे हे आम्हाला माहित झाले पाहिजे; अशी मागणी संबंधित नातेवाईकांनी केली आहे. आरोपी मोकाट फिरत असून त्यांच्यावर पोलीस काहीही कार्यवाही करत नाही. न्याय मिळाला नाही; तर आम्ही उपोषण करू असा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांनी निवेदन दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lokmanya Tilak Award: PM मोदींनंतर नितीन गडकरींचाही पुण्यात सन्मान, लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर

Maharashtra Live News Update: लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान

Prajakta Mali : प्राजक्तासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्याची धडपड; थेट लिफ्टच्या दारात उभा राहीला, पाहा VIDEO

Tmkoc: बाबो! इतक्या वर्षाची झाली 'तारक मेहता' फेम दया भाभी; खरं रूप पाहून आश्चर्य वाटेल

Genelia Deshmukh: जेनियाचं सौंदर्य पाहू वेड लागलं, फोटो एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT