Beed’s Nadlegaon erupts in outrage after Gram Rojgar Sevak is brutally assaulted and robbed. saam tv
महाराष्ट्र

Beed Crime: बीडमधील गुंडाराजला पोलिसांची साथ? गावगुंडांकडून ग्रामरोजगार सेवकाला जबर मारहाण; दोन्ही पाय मोडले, दुचाकीला बांधून ओढलं

Village Goons Brutally Assault Employment Sevak in Beed : बीडमधील नादलगाव येथील एका ग्रामरोजगार सेवकावर क्रूर हल्ला झालाय. त्याला दुचाकीला बांधून ओढण्यात आलं. सेवकाचे दोन्ही फ्रॅक्चर झालेत. जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Bharat Jadhav

  • ग्रामरोजगार सेवकाला दुचाकीला बांधून ओढत नेत गावगुंडांनी अमानुष मारहाण केली.

  • मारहाणीमध्ये त्यांचे दोन्ही पाय मोडले

  • मारहाणीवेळी जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

बीड जिल्हातील नादलगाव येथील आदिवासी समाजातील ग्रामरोजगार सेवकाला जातिवाचक शिवीगाळ करत गावातील काही दहा ते बारा गावगुंडानी मारहाण केलीय. ग्रामरोजगार सेवकाच्या घरात दोन्ही पाय मोडलेत. मारहाण केल्यानंतर गुंडांनी त्याच्या खिश्यातील ५० हजार रूपये , मोबाईल काढून घेतला.

ही घटना दिनांक ६ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. गावगुंडांनी ग्रामरोजगार सेवकाला दुचाकीचाला बांधून गावातील चौकात ओढत आलं. त्यानंतर त्याला लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. इतकेच नाहीत पोलिसांनी ग्रामरोजगार सेवकांची साधी तक्रार सु्द्धा घेतली नाही.

'तु लय माजलास, तुला आम्ही सोडणार नाही, जिवे मारून टाकूत, तुझ्या कुटूबाला गावात राहू देणार नाहीत, अशा धमक्या नादलगाव येथील ग्रामरोजगार सेवकाला जबर मारहाण करण्यात आली. ही घटना ६ डिसेंबर रोजी घडली. जालिंदर सुरवसे (वय ३५ वर्षे ), असं ग्रामसेवकाचे नाव आहे. सुरवसेला जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली.

सुरवसेला दुचाकीला बांधून गावातील चौकात ओढत नेलं. लाथाबुक्यानी आणि लोखंडी रॉड, काठ्यांनी मारहाण केली. याप्रकरणी तलवाडा पोलीस स्टेशन येथे जालिंदर सुरवसे यांची बहीण उषा सांळूके आणि आई या दोघी तक्रार देण्यासाठी गेल्या. त्यांना पोलिसांनी राजकीय दबावापोटी पोलीस स्टेशनच्या बाहेर काढले.

बीड जिल्ह्यातील गुंडागर्दी काही करता कमी होताना दिसत नाहीये. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्याच नाव अख्खा राज्यात चर्चेत आलं. त्यानंतर तेथील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आले. मात्र बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होताना दिसत नाहीये. बीडमधील गावगुंडांना कायदाचा धाक राहिला नाहीये.

राजकीय दबावातून पोलीस यंत्रणा सुद्धा त्यांना वरहस्त देतेय. त्याचेच उदाहारण शुक्रवारी घडलेल्या घटनेवरून सिद्ध झालंय. मारहाण झालेल्या ग्रामरोजगार सेवकाची आई आणि बहिण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना पोलीस स्टेशनमधून बाहेर काढण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: निदा खानचं TCS मधून निलंबन

Sai Tamhankar: बोल्ड बिंदास ब्यूटीफुल सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक, निळ्या साडीत केलं खास फोटोशूट

Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेला महिलांनी नेसा पिवळ्या रंगाची साडी, लेटेस्ट ट्रेडिंग डिझाईन्स

EPFO 3.0: ATM मधून ५ मिनिटांत काढा PFचे पैसे ; कशी असेल प्रोसेस? वाचा संपूर्ण माहिती

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT