Beed Crime Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime : शेत जमिनीतून भावकीत वाद; पाच जणांकडून महिलेला जबर मारहाण

Crime News Beed : दोन दिवसांपूर्वीच उपसरपंचाला ग्रामस्थांकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. यानंतर आता शेतीच्या वादावरून महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. नातेवाईकांनी मिळून एका महिलेला जबर मारहाण केली आहे.

Rajesh Sonwane

योगेश काशीद 

बीड : बीड जिल्ह्यात मारहाण, खून अशा घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे बीड कि बिहार असाच प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. यात पुन्हा एक घटना समोर आली असून शेत जमिनीच्या वादातून एका महिलेला तिच्या नातेवाईकांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

बीडच्या पालवण येथे सदरची घटना घडली आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून मारहाण करणे हे आता नित्याचेच झाले आहे. भररस्त्यावर मारहाणीच्या घटना घडत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वीच उपसरपंचाला ग्रामस्थांकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. यानंतर आता शेतीच्या वादावरून महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. 

महिला गंभीर जखमी 

पालवण येथे शेत जमिनीच्या वादातून नातेवाईकांनी मिळून एका महिलेला जबर मारहाण केली आहे. लता विठ्ठल मस्के असं जखमी असलेल्या महिलेचे नाव असून शेतात काम करत असताना शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनीच ही मारहाण केली. लोखंडी रॉड लाठ्या-काठ्याने मारहाण झाली असून मारहाण करणाऱ्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. मारहाणीत महिला जखमी असून जिल्हा रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहेत. 

पाच जणांविरोधात गुन्हा दाखल 

बारा वर्षांपूर्वीच शेत जमिनीच्या वाटण्या झाल्या होत्या. मात्र मारहाण करणाऱ्यांनी त्यांच्या शेत जमिनीची विक्री केली. उर्वरित राहिलेली शेत जमीन दिली जावी. यासाठी भावकीतील व्यक्तींनी या महिलेला मारहाण केली. या प्रकरणी पाच जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असला तरी तो किरकोळ स्वरूपाचा आहे. त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी पीडित कुटुंबाने केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाप्पा पावलाच म्हणावं लागेल...! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी; लोणेरे पूल वाहतुकीसाठी खुला

Maharashtra Live News Update: अकोला- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा जागीच ठार

Disha Patani: 'रेड चिली' दिशा पटानीचा हॉट लूक

Pune News:पुण्यातील वाहतूक कोंडी काही सुटेना; नागरीक त्रस्त, प्रशासन मात्र सुस्त|VIDEO

Shaniwar Wada: पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याचा रंजक इतिहास आणि मनोरंजक गोष्टी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT