Beed Crime Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime : खोटे सोने देऊन फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात; अनेक गुन्ह्यांची उकल

Beed News : टोळीतील सदस्यांनी बीडमधील अनेक जणांची लाखों रुपयाची फसवणुक केल्याचे तपासात उघड झालं आहे. याबाबत पोलिसांकडून आणखी तपास सुरु आहे

विनोद जिरे

बीड : सोन्याचे दागिने देण्याच्या बहाण्याने बोलावून पितळासारखा धातू देऊन फसवणूक केली जात होती. (Beed) या प्रकरणात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फसवणूक करणाऱ्या टोळीला पकडण्यात (Police) पोलिसांना यश आले आहे. (Live Marathi News)

बीड शहरातील मुकुंद वसंतराव भोगे हे कंकालेश्वर मंदिर परिसरात असताना शत्रुघन रामलाल सोळंकी (रा. उमरखेड जि. नागपूर) व नंदू भालचंद्र सोळंकी (रा. तिरोडी जि. गोंदीया) हे त्याठिकाणी आले. त्यांनी भोगे यांना सोन्याचे दागिने देण्याचे अमिष दाखवले. दरम्यान, भोगे यांना एका लाल रंगाच्या बटव्यामधून पिवळा धातू असलेली एक माळ दिली. मात्र, हे (Gold) सोने नसून पितळ असल्याचे त्यांच्या कालांतराने लक्षात आले. त्यानंतर भोगे यांनी पेठ बीड पोलीस (Beed Police) ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. दरम्यान पोलिसांनी तात्काळ दखल घेत फसवणाऱ्या दोघांना अटक केली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनेकांची केली फसवणूक 

पोलिसांनी सदर टोळीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून अनेक गुन्ह्याची उकल पोलिसांनी केली आहे. यात या टोळीतील सदस्यांनी बीडमधील अनेक जणांची लाखों रुपयाची फसवणुक केल्याचे तपासात उघड झालं आहे. याबाबत पोलिसांकडून आणखी तपास सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Ganesh: अभिनेते दिल्ली गणेश यांचे निधन, वयाच्या ८०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jalgaon Crime : विभक्त राहत असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीचा घरात घुसून पत्नीवर प्राणघातक हल्ला

STD, ISD आणि PCO चा फुलफॉर्म काय? या तिघांमधील फरक तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या एका एका क्लिकवर

Maharashtra Election : भाजपला सर्वाधिक ताकद कोण देणार? किंगमेकरसाठी शिंदे-दादांमध्ये स्पर्धा?

VIDEO: संभ्रम नाहीच, तुमच्या हिताचा निर्णय तुम्ही घ्या, पण.. ; जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT