crime News Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime News: धक्कादायक! गोळीबार अन् तलवारबाजीच्या घटनेने बीड हादरले; 4 जण गंभीर जखमी

Beed Marathi News: जुन्या वादातून भांडणाची कुरापत काढून दोन गट आमने-सामने...

विनोद जिरे

Beed News Today: बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्या,गोळीबार, हाणामारी या सारख्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता बीड शहरात गोळीबार आणि तलवारबाजी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)

संपूर्ण प्रकरण काय?

बीड शहरात गोळीबार आणि तलवारबाजी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात 4 जण जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत. जुन्या भांडणाच्या कारणावरून हा वाद झाला. यात दोन्ही गटाचे लोक अमाने सामने आले. यावेळी एकमेकांवर गोळीबार करत हवेतही गोळीबार करण्यात आला. ही घटना बीड शहरातील कालीकानगर भागात रात्री 11 वाजता घडली आहे. (Beed Crime News)

दरम्यान हा मामा-भाचे गँगचा वाद आहे. गोपाळ भिसे, मनिराम गायकवाड यांना गोळी लागली आहे. तर मारोती गायकवाड, नारायण गायकवाड या दोघांवर तलवारीचे वार करण्यात आले आहेत. दरम्यान पोलिसांनी आसाराम गायकवाड यास ताब्यात घेतले असून गावठी कट्टा जप्त केला आहे.तर याप्रकरणी बीडच्या (Beed) शिवाजीनगर पोलीस (Police) ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT