Marathwada Farmer: मराठवाड्यात गेल्या 5 महिन्यांत 391 शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणि शेतकऱ्यांना मदतीची घोषणा सरकारने केली असली तरी मराठवाड्यात त्याचा फारसा परिणाम दिसत नाही.
Marathwada Farmer
Marathwada FarmerSaam Tv
Published On

Marathwada Farmer News: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणि शेतकऱ्यांना मदतीची घोषणा सरकारने केली असली तरी मराठवाड्यात त्याचा फारसा परिणाम दिसत नाही. कारण मराठवाड्यात गेल्या पाच महिन्यांत ३९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. (Latest Marathi News)

Marathwada Farmer
Crimean-Congo Fever: सावधान! कोरोनापेक्षाही महाभयंकर व्हायरसची एन्ट्री; 'ही' लक्षणे दिसताच वेळीच सावध व्हा

यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या बीड (beed) जिल्ह्यात आहेत, बीड जिल्ह्यात ९८ शेतकऱ्यांनी (farmer) आत्महत्या केल्या तर धाराशिव जिल्ह्यात ८० शेतकऱ्यांनी आपला जीव दिला. नांदेडमध्ये ६४, संभाजीनगरमध्ये ५०, परभणी ३२, लातूरमध्ये २८, जालन्यात २५ तर हिंगोली जिल्ह्यातील १३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मागच्या वर्षी अतिवृष्टीसोबत संततधार पावसामुळे मराठवाड्यातील अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांच्या हाती खरीप हंगामात काहीच लागले नाही. शासनाने शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली होती. मात्र, ही मदत अद्याप शेतकऱ्यांच्या हातात पडली नाही. मेअखेरपर्यंत पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना विम्याचे पैसे दिले नाही.

Marathwada Farmer
Ayodhya Poul News: ठाकरे गटाच्या महिला नेत्यावर शाईफेक, घटनेनंतर अयोध्या पौळ यांची संतप्त प्रतिक्रिया

अवकाळी आणि गारपिटीमुळे रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कापसालाही भाव मिळाला नाही. यामुळे मराठवाड्यातील शेतकरी चोहोबाजूंनी अडचणीत सापडला आहे. एकीकडून केवळ घोषणा, आधार मात्र नाही आणि दुसरीकडे अस्मानी संकट सातत्याने येत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेला शेतकरी मरणाला जवळ करीत असल्याचे चित्र मराठवाडा दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com