Crimean-Congo Fever: सावधान! कोरोनापेक्षाही महाभयंकर व्हायरसची एन्ट्री; 'ही' लक्षणे दिसताच वेळीच सावध व्हा

Crimean-Congo Hemorrhagic Fever: एकीकडे संपूर्ण जग कोरोना व्हायरस आणि मंकीपॉक्स सारख्या महाभयंकर आजारातून सावरत असतानाच आणखी एका प्राणघातक विषाणूने दार ठोठावलं आहे.
Crimean-Congo Hemorrhagic Fever
Crimean-Congo Hemorrhagic FeverSaam TV
Published On

Crimean-Congo Hemorrhagic Fever in India: एकीकडे संपूर्ण जग कोरोना व्हायरस आणि मंकीपॉक्स सारख्या महाभयंकर आजारातून सावरत असतानाच आणखी एका प्राणघातक विषाणूने दार ठोठावलं आहे. क्रिमियन-कॉंगो हेमोरेजिक फिव्हर असं या विषाणूचं नाव असून शास्त्रज्ञांच्या मते या विषाणूची लागण झालेल्या रुग्णाला मृत्यूचा सर्वाधिक धोका असतो. सततच्या हवामान बदलामुळे हा विषाणू पसरत असल्याची माहिती आहे.

Crimean-Congo Hemorrhagic Fever
Kolhapur News : प्राध्यापिकेकडून औरंगजेबाचं उदात्तीकरण ‌करणारं वक्तव्य; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

या क्रिमियन-कॉंगो या विषाणूचे पहिले प्रकरण ब्रिटन आणि फ्रान्समध्ये दिसून आले आहे. हा विषाणू प्राण्यांमध्ये आढळून येत आहे. प्राण्यांचे मांस खाल्ल्याने त्याचा संसर्ग मानवांमध्ये सुद्धा पसरत आहे. या विषाणूला कसं नियंत्रित करायचं यावर अद्यापही उपाय शोधला गेलेला नाही. यावर लस शोधण्याचं काम शास्त्रज्ञांकडून सुरू आहे.

क्रिमियन-कॉंगो या विषाणूबद्दल बोलायचे झाले, तर त्याची लक्षणे फ्लू सारखी आहेत. अनेक लोकांमध्ये, घसा खवखवणे आणि उलट्या होणे, डोळे दुखणे किंवा जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते. डेंग्यूप्रमाणेच या तापामुळेही अवयव निकामी होऊ शकतात. अशा परिस्थितीत रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका असतो.

Crimean-Congo Hemorrhagic Fever
Mega Block on Sunday: मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर पडताय? उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर 'मेगाब्लॉक'

व्हायरस किती धोकादायक?

एपिडेमियोलॉजिस्टने सांगितले की, हा विषाणू काही नवीन नाही. आतापर्यंत जगभरात अनेक प्रकरणे समोर आली आहेत. भारतातही या प्रकरणाची नोंद झाली आहे. या धोकादायक विषाणूची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होते. भारतात या विषाणूचे फारसे प्रकरणे आढळून आलेली नाहीत.

सर्व प्रथम 1944 मध्ये, क्रिमियामध्ये या विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. या विषाणूची लागण झाल्यास रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाणे 40 टक्के आहे. जे कोविडपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, हा विषाणू टिंक नावाच्या किड्यांमुळे प्राण्यांमध्ये पसरला होता. हा किडा चावल्याने प्राण्यांना या विषाणूची लागण झाली होती.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com