Beed Crime Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime : मध्यरात्री हनुमानवाडीत थरार; पती- पत्नीला बेदम मारहाण, पतीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार, महिलेजवळील दागिने ओरबडले

Beed News : मध्यरात्रीच्या सुमारास तीन चोरांनी तुपे वस्तीवरील आजुबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावून घेतल्या. यानंतर भागवत तुपे यांच्या घराचे दार तोडून आत प्रवेश केला

Rajesh Sonwane

योगेश काशीद 

बीड : मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. घरात घुसून पती- पत्नीला मारहाण करत लूटमार केली. यात महिलेच्या गळ्यात असलेले दागिने ओरबडून नेले आहेत. तर विरोध करणाऱ्या पतीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करत दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. यात सदर इसम गंभीर जखमी झाला आहे. 

बाजूच्या घरांना कड्या लावून घरात केला प्रवेश 

बीडच्या शिरूर तालुक्यातील मानूर जवळील हनुमानवाडी येथील तुपे वस्तीवर मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान हि थरारक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास तीन चोरांनी तुपे वस्तीवरील आजुबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावून घेतल्या. यानंतर भागवत तुपे यांच्या घराचे दार तोडून आत प्रवेश केला. या वेळी भागवत तुपे यांच्या पत्नी सरस्वती यांचे तोंड दाबून गळ्यातील मंगळसूत्र काढले. 

पतीवर शस्त्राने केला वार 

महिलेच्या गळ्यातील दागिने तोडले. यावेळी आवाज आल्याने बाजूला झोपलेले पती भागवत तुपे यांना जाग आली. पती जागे झाल्याचे लक्षात येताच त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून डोके फोडले. यानंतर सरस्वती यांच्या पाकिटातील रोख दहा हजार रुपये आणि गळ्यातील तसेच घरात ठेवलेले दोन तोळ्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. यानंतर महिलेने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे नागरिक जमा झाले होते. 

पोलिसात गुन्हा दाखल 

शस्त्राने वार केल्याने तुपे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेप्रकरणी शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून शोध सुरु आहे. मात्र या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली असून दरोडेखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avoid Using Kokum: कोणत्या भाज्यांमध्ये कोकम टाकू नये?

MLC Election: विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी काँग्रेसचा मोठा डाव; पाठिंब्यासाठी ठाकरेंसमोर ठेवली एक अट

Marathi language : मराठीची सक्ती लादू नका, शिंदेंसेनेच्या नेत्याचं सरनाईकांना पत्र, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News Live Update: दक्षिण रायगडला अवकाळी पावसाने झोडपले

Siddheshwar Express : सिद्धेश्वर एक्सप्रेसवर दरोडा; RPF ने उधळवला डाव, ९ महिलांना बेड्या

SCROLL FOR NEXT