Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime News : ग्राहकाने केले असे काही की किराणा दुकानदारावर आली आयुष्य संपवण्याची वेळ; बीडमधील हृदयद्रावक घटना

Beed News : त्रासाला कंटाळून अविनाशने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.

विनोद जिरे

Grocer : बीडमधून एक खळबळजनक बातामी समोर आली आहे. ग्राहकाच्या त्रासाला कंटाळून एका किराणा दुकानदाराने आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या धारुर तालुक्यातील कान्नापूर येथे घडली. अविनाश आशोक देशमुख (वय 32, रा. कान्नापूर ता. धारुर) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या दुकानदार तरुणाचे नाव आहे. (Beed News)

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अविनाश देशमुख यांचे कान्नापूर येथे दुकान आहे. गावातीलच स्वप्नील, सुरज, सुमित्रा यांना अविनाशने किराणा साहित्य उधार दिले नाही. याचा राग आल्याने त्यांनी अविनाश देशमुख यांना सतत त्रास देण्यास सुरुवात केली. त्याचा वारंवार मानिसक छळ केला. या त्रासाला कंटाळून अविनाशने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान या प्रकरणी मयताचे भाऊ संतोष देशमुख यांच्या फिर्यादीवरून बीडच्या सिरसाळा पोलीस ठाण्यात, स्वप्नील रामकिशन देशमुख, सूरज रामकिशन देशमुख, सुमित्रा रामकिशन देशमुख यांच्यावर कलम 306, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

अनेक व्यक्ती किराणा दुकानात उधारीवर सामान घेतात. उधारीचे पैसे वेळेवर न दिल्यास त्या दुकान मालकाचे यात मोठे नुकसान होते. अविनाश यांच्या दुकानामध्ये देखील उधारीमुळे त्यांचे नुकसान होत होते. त्यामुळे त्यांनी गावातल्या स्वप्नील, सुरज आणि सुमित्रा यांना उधारी सामान देणे बंद केले होते.

यामुळे या सर्वांनी मिळून अविनाश यांचा अपमान करण्याची एक संधी सोडली नाही. सततचा मानसीक त्रास होत असल्याने अविनाश यांनी शेवटी जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Agriculture Crisis: राजकारणानं घेतला शेतकऱ्याचा बळी? तहसील कार्यालयात शेतकऱ्याची आत्महत्या

IPS अधिकाऱ्यानं घरातच आयुष्य संपवलं, IAS पत्नीकडून गंभीर आरोप, संशयाची सुई नेमकी कुणाकडे?

Maharashtra Live News Update: आईने प्रियकराच्या मदतीने केली पोटच्या मुलाची हत्या

Fact Check: बाजारात ५५० रूपयांचं कॉईन? १०० आणि ७५ रुपयांचंही कॉईन येणार?

Accident: मुंबईत अपघाताचा थरार! हायवेवर रेस लावणं पडलं महागात, महागड्या पोर्शे कारचा चुराडा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT