Nashik Crime News : भयंकर! विद्यार्थ्यांचा परीक्षेदरम्यानचा वाद टोकाला पोहचला, दुसऱ्या दिवशी घोळक्याकडून कोयत्याने सपासप वार

nashik latest crime news : 10 वीच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Nashik Civil Hospital
Nashik Civil HospitalSaam tv
Published On

तबरेज शेख

Nashik News : नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले आहे. याचदम्यान, किरकोळ करणाहून नाशिकमध्ये एका 10 वीच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील (Nashik) काकासाहेब देवधर शाळेमध्ये दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या ओम शिंदे या विद्यार्थ्याचा परीक्षेदरम्यान इतर काही विद्यार्थ्यांशी वाद झाला होता. हा वाद पहिल्या दिवशी मिटला.

मात्र, दुसऱ्या दिवशी त्या विद्यार्थ्यांनी (Students) व त्यांचे साथीदार अशा थेट 15 ते 20 जणांच्या घोळक्याने ओम शिंदे या विद्यार्थ्यावर 10 वीचा पेपर सुटल्यानंतर घरी जातेवेळी घेरून त्याच्यावर थेट धारदार शस्त्र आणि कोयत्याने हल्ला केला. यात ओम शिंदे हा गंभीर जखमी झाला आहे. तर त्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये (Hospital) अधिक उपचार सुरू आहे.

Nashik Civil Hospital
Pune Crime News: पुण्यात चालकाची मुजोरी; वाहतूक पोलिसाला 50 मीटरपर्यंत फरफटत नेले, परिसरात खळबळ

एकीकडे शहरात कोयता गँगची दहशत वाढताना दिसून येत आहे अगदी शाळकरी मुले सुद्धा मोहित्याने एकमेकांवर हल्ला करण्याची घटना घडल्याने शहरांमध्ये खळबळ उडाली आहे. शाळकरी मुलांमध्ये तेही दहावीच्या परीक्षेदरम्यान अशा पद्धतीने थेट कोयत्याने हल्ला होण्याची घटना घडल्याने पोलीस प्रशासना समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Nashik Civil Hospital
Crime News: नियतीचा क्रूर खेळ! दोन दिवसांवर लग्न; तरुणी अंघोळीला गेली अन्... भावी वधूच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ

दरम्यान, या घटनेतील संशयितांचा पोलीस शोध घेत असून हल्लेखोरांवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी ओम शिंदे च्या नातेवाईकांनी केली आहे. नाशिकमधील वाढते गुन्हे नाशिककरांच्या चिंतेचा विषय बनला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com