Crime News: नियतीचा क्रूर खेळ! दोन दिवसांवर लग्न; तरुणी अंघोळीला गेली अन्... भावी वधूच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ

Crime News Update: ज्या घरात नवरदेवाची वरात येणार होती, त्याच घरात भावी नवरीची अंत्ययात्रा निघाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar NewsSaamtv

>>नवनीत तापडिया, छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime News: घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच हळदीच्या आदल्या दिवशी अंघोळीला गेलेल्या भावी नववधूचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालूक्यात असलेल्या वांगी खुर्द या गावातील ही ह्रदद्रावक घटना घडली आहे. (Latest Marathi News)

Chhatrapati Sambhajinagar News
Pune News: राहुल गांधी प्रकरणावर विरोधक आक्रमक! बच्चू कडूंची आमदारकी कधी रद्द होणार? पुण्यात झळकले बॅनर

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वांगी खुर्द गावातील रोहिणी उर्फ पल्लवी भगवान जाधव या तरुणीच्या लग्नाची घरात तयारी सुरू होती. दोन दिवसानीं लग्न असल्याने पत्रिका वाटल्या बस्ता बांधण्याचा कार्यक्रमही झाला. मात्र एकीकडे लग्नाची लगबग सुरु असतानाच अंघोळीला गेलेल्या 18 वर्षीय भावीवधूचा पाणी घेताना हिटरचा शॉक लागला. ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.

Chhatrapati Sambhajinagar News
Political News : चोरांना चोर म्हटलं! हा काय गुन्हा झाला?...; सामना अग्रलेखातून मोदींवर निशाणा

या दुखःद आणि दुर्देवी घटनेने संपूर्ण कुटूंबावर शोककळा पसरली. ज्या घरात नवरदेवाची वरात येणार होती, त्याच घरात भावी नवरीची अंत्ययात्रा निघाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. (Chhatrapati sambhajinagar News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com