Beed Parli Crime Saamtv
महाराष्ट्र

Beed Crime News: बीड हादरलं! लग्नात शुल्लक कारणावरुन २ गटात राडा; एकाचा जागीच मृत्यू

Parli News: दिवसाढवळ्या शहरात किरकोळ वादातून हत्या झाल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

विनोद जिरे

Parli Crime News: बीडमधून एक धक्कादायक बातमी सध्या समोर येत आहे. बीडच्या परळी शहरात दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत 1 जण जागीच ठार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

अल्लाउद्दीन शेख (रा.नागापूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या हाणामारीत काहीजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय परळी येथे उपचार सुरू आहे. या घटनेने संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला आहे. (Crime News In Marathi)

लग्नात झाला वाद...

याबाबत अधिक माहिती अशी की, परळी (Parli) शहरातील बरकत नगर भागात एक लग्न सोहळा सुरू असताना किरकोळ कारणावरून दोन गटांत अचानक वाद झाला. हा वाद इतका वाढत गेला की मारामारीपर्यंत पोहचला. यानंतर दोन गटांत तुंबळ हाणामारी सुरू होवून सर्वजण एकमेकांवर अक्षरश: तुटून पडले. (Crime News)

एकाचा मृत्यू...

या भांडणात धारदार शस्त्रांचा वापर केला. ज्यामध्ये एकजण जागीच ठार झाला तर काही जण जखमी आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मयत इसम व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. (Beed News)

परिसरात खळबळ...

या भांडणात अल्लाउद्दीन शेख यांना आपला जीव गमवावा लागला आहे. ते नागापूर येथील रहिवासी असून त्यांचा पानटपरीचा व्यवसाय आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला आहे. दिवसाढवळ्या शहरात किरकोळ वादातून हत्या झाल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. परळी शहरातील संभाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pension Rules : सेवानिवृत्तीनंतर पुन्हा सरकारी नोकरी मिळाली, तर पूर्ण पगार अन् पेन्शन किती मिळणार? न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Maharashtra News Live Update: राणा जगजित सिंह पाटील शरद पवार यांना भेटायला ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल

Vastu Shastra: दररोज नकळत तुमच्याकडून होतायत या 4 चुका; घरात येते नकारात्मकता, वास्तुशास्त्राचे नियम वाचा

Sleeping After Heart Attack: डाव्या की उजव्या? हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर कोणत्या कुशीवर झोपणं ठरेल फायदेशीर?

महाराष्ट्रासाठी खूशखबर! मुंबई-बंगळुरूनंतर आणखी एक स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस धावणार, कोणत्या शहराला होणार फायदा?

SCROLL FOR NEXT