Beed Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime : बीड पुन्हा हादरलं! मध्यरात्री धाडसी दरोडा, प्रतिकार करणाऱ्यांवर दरोडेखोरांनी केले वार

Beed Crime News : बीड जिल्ह्यात मध्यरात्री दरोडा. सोन्याचे दागिने आणि सव्वा लाखांची रोकड लंपास; पाठलाग करणाऱ्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला. पोलिसांकडून सखोल तपास सुरू.

Alisha Khedekar

  • बीडच्या खळवट निमगाव येथे मध्यरात्री सशस्त्र दरोडा

  • सोन्याचे दागिने आणि सव्वा लाखांची रोकड लंपास

  • चोरांचा पाठलाग करणाऱ्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला

  • पोलिसांकडून गुन्हा दाखल

  • परिसरात भीतीचे वातावरण निर्माण

योगेश काशिद, बीड

बीडच्या खळवट लिमगाव गावात धाडसी दरोड्याची घटना उघडकीस आली आहे. पाच ते सहा चोरट्यांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवून सोनेचांदीच्या दागिन्यांसह सव्वा लाखांची रक्कम लुटली. धक्कादायक म्हणजे या चोरट्यांनी एका व्यक्तीला जबर मारहाण देखील केली आहे. या सशस्त्र दरोड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना बीडमधील वडवणी तालुक्यातील खळवट निमगाव या गावात मध्यरात्रीच्या दरम्यान घडली आहे. पाच ते सहा अज्ञात चोरट्यांनी धारधार शस्त्राचा धाक दाखवून अभिमान मारुती राऊत यांच्या घराचे मुख्य गेट तोडून घरात प्रवेश केला.

त्यानंतर घरातील झोपलेल्या मंडळींना धाक दाखवला आणि कपाटातील ठेवलेले साडेसात तोळे सोने, एक लाख चोवीस हजार रुपयांची रक्कम स्वतःकडे ठेवली. तर दुसऱ्या ठिकाणी हरिभाऊ दिगंबर राऊत यांच्या घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेली दोन तोळे सोने या चोरट्यांनी लुटले.

यानंतर लुटारूंनी धमकावत घटनस्थळावरून पळ काढला. यावेळी हरिभाऊ राऊत यांनी चोरांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पळापळी करत असताना चोरट्यांनी त्यांच्या पाठीवर शस्त्राने मारहाण केली यामध्ये ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

SCROLL FOR NEXT