Beed Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! फरार आरोपींकडून घरात घुसून मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Beed Crime News : बीड शहरातील बहिरवाडी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या घरात घुसून मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

Beed : बीडमध्ये पुन्हा एकदा हाणामारीची घटना घडली आहे. बीड शहरात पेठ बीड भागात एका व्यक्तीला मारहाण झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आकाश माने असे आहे. बीड शहरातील बहिरवाडी परिसरात आकाश माने राहतो. घरी जाऊन त्याला मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये फरार कुख्यात आरोपी सिद्धार्थ जाधव आणि रोहित जाधव यांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे.

व्हायरल व्हिडीओमधील आकाश माने या व्यक्तीला मारहाण करणाऱ्या आरोपींवर चोरी, मारहाण, गोळीबार, दरोडा अशा प्रकारचे गंभीर गुन्हे आहेत. आठ दिवसांपूर्वी मारहाण झाली आहे, पण या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोपींच्या दहशतीमुळे अद्याप या प्रकरणात पीडित व्यक्तीने गुन्हा दाखल केला नसल्याचे समोर आले आहे.

शेतात दगड का टाकले? जाब विचारल्याने दोघांना मारहाण

बीड जिल्ह्यात शुल्लक कारणांवरून वाद, मारहाणी आणि खुनाच्या घटना सातत्याने घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी किरकोळ कारणांवरून राडा होतो आहे. आणि काही वेळेस त्याचा जीवघेणा परिणामही पाहायला मिळतो आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याची तुलना आता थेट बिहारशी केली जात आहे. याच मालिकेत शिरूर कासार तालुक्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतामध्ये दगड टाकल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद उफाळून आला. 'दगड का टाकलास?' असा सवाल केल्याने दोघांना जबरदस्त मारहाण करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation GR: सरकारला हा अधिकार नाही, आम्ही कोर्टात जाणार; जीआरविरोधात छगन भुजबळ आक्रमक

Biggest Landowner India : सरकारनंतर भारतात सर्वाधिक जमीन कुणाकडे? तब्बल १७ कोटी एकर जागा आहे नावावर

Maharashtra Live News Update: सुवर्णनगरीत सोन्याचे दर १ लाख ५ हजारांवर

GK: पौर्णिमेला उलट्या दिशेने वाहणारी नदी कोणती आहे आणि कुठे आहे?

Bhiwandi Crime : धडापासून शिर वेगळे करत फेकले खाडीत; महिलेच्या हत्येचा उलगडा, धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT