Beed Crime News in Marathi, Beed Latest Marathi News  विनोद जिरे
महाराष्ट्र

कर्जबाजारी शेतकऱ्यानं विष पिऊन संपवली जीवनयात्रा; ५ दिवसांपूर्वीच मुलीचे लावून दिले होते लग्न

पाच दिवसांपूर्वी लाडक्या मुलीचा थाटात लग्न सोहळा केला, त्यानंतर उचलले टोकाचे पाऊल

विनोद जिरे

बीड: ५ दिवसांपूर्वी मुलीचे लग्न लावून शेतकरी (Farmers) बापाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना बीडच्या (Beed) वडवणी तालुक्यातील देवडी गावात (village) घडली आहे. आसाराम दत्तू सांगळे (वय-४४) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. वडवणी तालुक्यातील देवडी गावातील शेतकरी आसाराम दत्तू सांगळे हे गेल्या काही दिवसांपासून कर्जबाजारी झाले होते. ४- ५ दिवसांपूर्वीच या शेतकऱ्यांच्या मुलीचे मोठ्या थाटात लग्न (marriage) झाले होते. (Beed Latest Marathi News)

हे देखील पाहा-

मुलीच्या लग्नाला झालेला खर्च आणि पुर्वीचे कर्ज कसे फेडावे? या चिंतेत ते राहत होते. गेल्या ३-४ दिवसापासून मी कर्ज कसे फेडू आणि संसाराचा गाडा कसा चालवू? माझे कसे होणार? असे सारखे म्हणत होते. या कर्जामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी काल शेतातील राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले होते. विषारी औषध घेतले हे माहीत होताच, त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

परंतु, उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. या दुर्दैवी घटनेने देवडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान मयत शेतकऱ्याच्या पश्चात आई- वडील, चार भाऊ, भावजयी, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर महत्वाची बैठक सुरू

Maharashtra News Live Update: उजनी धरणातील पाण्याचे ऑगस्टपर्यंत नियोजन

Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; सुवर्णनगरीतील २२ अन् २४ कॅरेटचे दर किती?

CBSE Class 12 Result 2026: बारावीचा निकाल कधी लागणार? मोठी अपडेट समोर; मोबाइलवर रिझल्ट कसा पाहाल?

Bigg Boss Marathi 6: 'मला राकेश बापटच्या मुलांची आई व्हायचंय...'; राखी सावंतचं व्यक्त केली धक्कादायक इच्छा

SCROLL FOR NEXT