Bhiwandi Crime News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: दुसऱ्या लग्नाचे आमिष, महिलेची फसवणूक करत मुलाची विक्री; धक्कादायक घटनेने बीडमध्ये खळबळ!

Beed Majalgaon News: या प्रकरणी सहा जणांविरोधात बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विनोद जिरे

Beed Crime News:

पतीपासून विभक्त महिलेला दुसरे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवत तिच्या एका वर्षाच्या मुलाला ५० हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार बीडमधून समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी सहा जणांविरोधात बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोमल श्रीराम चव्हाण ही बीडच्या (Beed) माजलगाव (Majalgaon) तालुक्यातील गोवर्धन गावातील रहिवासी आहे. या २० वर्षीय महिलेचे 3 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र सध्या पतीसोबत विभक्त झाल्याने ती आपल्या आईवडिलांसोबत राहते. तसेच या महिलेला एका वर्षाचा मुलगाही आहे.

या महिलेच्या मामाने तिची ओळख शाहुनगर येथील छाया श्रीराम देशमुख या महिलेशी करुन दिली होती. १८ सप्टेंबर रोजी ही महिला छाया देशमुखच्या घरी आली असता त्या ठिकाणी तिची किशोर वासुदेव भोजणे रा. जिगाव, ता. नांदुरा, जि. बुलडाणा या तरुणाशी ओळख झाली. हा तरुण आपला मावसभाऊ असल्याचे छाया देशमुखने तिला सांगितले. या दोघांनी महिलेला दुसरे लग्न करण्याचा सल्ला देत वर शोधून देण्याची तयारी दर्शवली.

तसेच तुझ्या मुलाची सोय लावू असेही तिला सांगण्यात आले. यानंतर आणखी दोघांच्या मदतीने तिला घेवून हे सर्वजण कर्नाटकातील हुबळीला गेले. याठिकाणी त्यांनी पिडीत महिलेचा विरोध झुगारुन 1 वर्षीय मुलाची ५० हजारात विक्री केली. मुलाची विक्री करुन ते सर्वजण गोव्याला गेले. गोव्याहून परत येताना बसमध्ये बसलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला या सर्वांवर संशय आला.

त्यांनी याबाबत शिवाजीनगर पोलिसांना माहिती देत बसस्थानकात सर्वांना पकडून दिले. ज्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघड झाले. या प्रकरणात छाया व किशोर यांना न्यायालयाने 29 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

Nagpur: गँगस्टरच्या पत्नीसोबत अफेअर, महिलेचा मृत्यू; इप्पा गँगच्या मनात वेगळाच संशय, 'टोपी'च्या शोधात ४० लोक

Maharashtra Population: महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे?

SCROLL FOR NEXT