Beed Farmer Sugriv Jadhav Saam TV
महाराष्ट्र

बळीराजा थांब रे...! कर्जबाजारीपणाला कंटाळून ३८ वर्षीय शेतकऱ्याने संपवलं जीवन

राज्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे.

विनोद जिरे

बीड : राज्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या (Farmer) आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. लातूरमधील औसा तालुक्यात एका कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, आता बीडमध्ये (Beed) कर्जबाजारीपणा आणि आर्थिक नैराश्यातून एका 38 वर्षीय विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना बीडच्या राजेगावमध्ये उघडकीस आली. (Beed Latest News)

सुग्रीव देवीदास जाधव (वय 38) रा. राजेगाव असं आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणाचे नाव आहे. मयत सुग्रीव जाधव यांनी आपल्या स्वतःच्या राहत्या घरात, एका रॉडला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर घटनेची माहिती कळताच केज पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

यावेळी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेद करण्यासाठी नांदूरघाट रुग्णालयात दाखल करत घटनेचा पंचनामा केलाय. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची आकस्मात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयत सुग्रीव जाधव यांच्या पश्चात पत्नी, एक 14 वर्षाची मुलगी व दुसरा 12 वर्षाचा मुलगा, असा परिवार आहे.

लातूरमध्येही शेतकऱ्याची आत्महत्या

औसा तालुक्यातील मसलगा (खु) येथील शेतकरी संतोष भाऊराव पाटील यांनी स्वतः च्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली आहे. मयत शेतकरी संतोष पाटील यांच्या कुटुंबात १ हेक्टर ३२ आर. जमीन असून याप्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मयत संतोष पाटील यांच्या नावे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे १ लाख ९७ हजार कर्ज आहे.

तसेच अन्य बँकेचेही कर्ज असल्याने या कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे. संतोष पाटील यांच्या मृतदेहाचे बेलकुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले आहे. याप्रकरणी बाळासाहेब पाटील यांच्या माहितीवरून किल्लारी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

SCROLL FOR NEXT