Husband Kills Wife then Ends Life samm tv
महाराष्ट्र

Beed Crime: संतापजनक! 50 वर्षीय नराधमांकडून 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडितेला जीवे मारण्याची धमकी

Minor Girl Physical Abused: बीड परळीत एका ९ वर्षांच्या मुलीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Bharat Jadhav

बीडच्या परळीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. परळीच्या धर्मापुरी गावात 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका 50 वर्षाच्या नराधमांने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. खाऊ देण्याच्या बहाण्याने मुलीला जवळ बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अत्याचार केल्यानंतर नराधमाने मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पोक्सो कायद्या अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नराधमाने मुलीला खाऊ देतो म्हणून बोलावून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. जर कोणाला सांगितलं तर जीवे मारून टाकेन,अशी धमकी नराधमाने दिला होती. पीडितेने हिम्मत करत वडिलांना घडलेला सगळा प्रकार संगितला. याआधीही आपल्यावर अत्याचार झाल्याचंही पीडितेने वडिलांना सांगितलं. त्यानंतर गावातील नागरिकांनी त्या नराधमाला पकडत चोप दिला. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

बीडच्या परळीमध्ये १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसापूर्वी घडली होती. परळी तालुक्यातील धारावती तांड्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी मुलींच्या पालकांनी दोघांविरोधात तक्रार दाखल केली असून त्यांच्याविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी फरार आहेत. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत. दोन नराधमांनी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या घरी बोलावलं. त्यानंतर एकाने मुलीचे हातपाय बांधले, तोंडामध्ये कपड्याचा बोळा कोंबला. आणि तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT