Beed Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

बीडला हादरवून टाकणारी घटना; 20 वर्षीय तरुणासोबत घडलं भयंकर...

ही घटना बुधवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

विनोद जिरे

बीड : गेल्या काही दिवसांपासून बीड (Beed) जिल्ह्यात गुन्हेगारीचं (Crime) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अशातच शहरातील एका परिसरात 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह (Death Body) आढळून आला आहे. घटनास्थळी रिव्हॉल्वर देखील आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अक्षय भानुदास भांडवले (वय 20) राहणार बार्शी नाका बीड, असं मयत महाविद्यालयीन तरुणाचं नाव आहे. (Beed Latest Crime News)

बीड शहरातील बार्शी रोड लगत असणाऱ्या तिरुपती नगरमध्ये, अक्षय भांडवले या महाविद्यालयीन विद्यार्थी तरुणाचा मृतदेह आढळला आहे. ही घटना बुधवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. तर घटनेची माहिती कळताच बीडच्या शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

त्यामुळं प्राथमिक माहितीवरून खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला असून शिवाजीनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान अक्षयचा खून झाला की त्याने आत्महत्या केली? याचं कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

'टेस्ला'च्या फ्लाईँग कारवर मीम्स व्हायरल, मस्क यांच्या निर्मितीला भारतीयांची मिश्किल दाद

Punjab Accident: भरधाव कारनं मनरेगा मजुरांना चिरडलं; 8 जणांचा जागीच मृत्यू

बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक, गोकुळ'च्या निवडणुकीत अंधश्रद्धेचा बाजार

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर १० राऊंड फायरिंग; 2 जण गंभीर जखमी, सिनेसृष्टीत खळबळ

SCROLL FOR NEXT