Beed News X
महाराष्ट्र

बीडमध्ये बालविवाह प्रथा सुरूच, १५ वर्षांखालील दहा मुली गर्भवती; धक्कादायक आकडेवारी समोर

Child Marriage : बीड जिल्ह्यामध्ये बाल विवाहाशी संबंधित धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीमुळे बीडमध्ये बालविवाह प्रथा अजूनही अस्तित्त्वात असल्याचे म्हटले जात आहे. या विरोधात शासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

Yash Shirke

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात बाल विवाहबाबत धक्कादायक माहिती आणि आकडेवारी समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या प्रजनन व बाल आरोग्य पोर्टलवरील नोंदीनुसार गेल्या वर्षभरात १८ वर्षांखालील बारा मुली गर्भवती झाल्याचे आढळलं आहे. तर तब्बल ११ मुलींची प्रस्तुती झाली आहे. या मुली १३ ते १७ वर्ष या वयोगटातल्या आहेत.

बीड, गेवराई, वडवणी, आष्टी, केज, धारूर आणि शिरूर कासार या तालुक्यातील घटना यामध्ये समाविष्ट आहेत. आरोग्य विभागाच्या आरसीएच पोर्टलवर गर्भवतींच्या नोंदीत अल्पवयीन मुलींच्या पतींचे नावही आहे. यावरुन मुलींचे बालविवाह झाल्याचं यातून दिसून आला आहे. याचा अर्थ अजूनही बीडमध्ये बालविवाह होत आहेत.

गेल्या वर्षभरात बारा मुली गर्भवती झाल्या असून त्यातल्या दहा मुलींचे वय फक्त पंधरा वर्षे इतकं होतं, तर बीड जिल्हा रुग्णालयात १३ ते १७ वयोगटातल्या ११ मुलींची प्रस्तुती झाली. यातल्या बहुतांशी मुली या लैंगिक अत्याचाराच्या बळी होत्या. बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार १८ वर्षाखालील मुलींचा आणि २१ वर्षाखालील मुलांचा विवाह बेकायदेशीर आहे या कायद्यानुसार बालविवाह लावून देणाऱ्या पालक मध्यस्थ व नातेवाईकांना दंड आणि तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे, बालविवाहाची खळबळ जनक आकडेवारी समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून बालविवाह रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

बीडमध्ये साखर कारखान्यात काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांमध्ये बालविवाहाचे प्रमाण जास्त असल्याचे देखील समोर आलं आहे आर्थिक अडचणी मुलींच्या सुरक्षेची भीती यासारख्या कारणांनी पालकांकडून मुलींचे लग्न लावून दिले जात आहे. बालविवाहांमुळे अल्पवयीन मुलींची गर्भधारणा नवजात बाळासह मुलींच्या जीवालाही धोका निर्माण होतो असे अनेक प्रश्न आरोग्य चे प्रश्न निर्माण होतात मात्र या धक्कादायक आकडेवारीमुळे बीड जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामध्ये चांगलीच खळबळ मारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT