केजमध्ये उत्साहाच्या भरात जंगी मिरवणूक काढणं भोवलं; नूतन नगराध्यक्षावर गुन्हा
केजमध्ये उत्साहाच्या भरात जंगी मिरवणूक काढणं भोवलं; नूतन नगराध्यक्षावर गुन्हा  SaamTvNews
महाराष्ट्र

केजमध्ये उत्साहाच्या भरात जंगी मिरवणूक काढणं भोवलं; नूतन नगराध्यक्षावर गुन्हा

विनोद जिरे

बीड : नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीनंतर उत्साहाच्या भरात जंगी मिरवणूक काढणं चांगलच महागात पडलंय. बीडच्या केज (Kej) नगरपंचायत मधील नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांसह जवळपास 200 जणांविरोधात जिल्ह्यात जमावबंदी आदेश मोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, पदभार स्वीकारण्यापूर्वीच गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा :

काँग्रेस (Congress) सोबत आघाडी करून जनविकास आघाडीच्या सिताताई बनसोड या केजच्या नगराध्यक्ष झाल्या आहेत. तर उपाध्यक्षपदी शीतल दांगट यांची निवड झाली. नूतन पदाधिकारी यांची निवडीनंतर शहरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शेकडो लोकांचा जमाव होता. बीड (Beed) जिल्ह्यात सध्या जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी आदेश लागू केले आहेत. मिरवणूक, मोर्चे आंदोलन याला बंदी आहे. मात्र, केजमध्ये ही बंदी मोडण्यात आल्याने, केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, नवनिर्वाचित नगराध्यक्ष (Mayor) सिता प्रदीप बनसोड, उपनगराध्यक्ष शितल पशुपतीनाथ दांगट, जनविकास परिवर्तन आघाडीचे नेते हारून चाँदपाशा इनामदार, जेष्ठ नेते अंकुश इंगळे, नगरसेवक आदित्य अशोकराव पाटील, पशुपतीनाथ दांगट, नगरसेवक सोमनाथ गुंड, सुग्रीव माणिक कराड, नगरसेविका पल्लवी ओमप्रकाश रांजनकर, नगरसेविका पदमीन गुलाब शिंदे, शकील ईनामदार यांचा गुन्हा (Case) दाखल झाल्याने आरोपींमधे समावेश आहे. तर इतरमध्ये जवळपास 200 जणांचा समावेश आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

SCROLL FOR NEXT