Beed Breaking News: मोठी बातमी! पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी; बीड जिल्ह्यात आणखी एका मुंडे समर्थकाने संपवले आयुष्य
Beed Loksabha Election Result:  Saamtv
महाराष्ट्र

Beed Breaking News: मोठी बातमी! पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी; बीड जिल्ह्यात आणखी एका मुंडे समर्थकाने संपवले आयुष्य

विनोद जिरे

बीड, ता. १६ जून २०२४

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर बीड जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने त्यांच्या दोन समर्थकांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी असे टोकाचे पाऊल न उचलल्याचे आवाहन केले होते. अशातच आज आणखी एका मुंडे समर्थकांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीड जिल्ह्यात पुन्हा एका पंकजा मुंडे समर्थकाने मुंडे यांचा लोकसभेतील पराभव जिव्हारी लागल्याने,गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.ही घटना बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील वारणी येथे आज घडली. गणेश (उर्फ) हरिभाऊ भाऊसाहेब बडे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पंकजा मुंडे या लोकसभेच्या निकालानंतर आजपासून बीड जिल्ह्यातील आभार दौऱ्यावर आहेत. आणि या दरम्यान त्या बीडच्या आष्टी तालुक्यातील इंदेवाडी येथील तसेच डिघोळआंबा येथे जाऊन. लोकसभेच्या पराभवानंतर पहिल्यांदाच त्या जिल्हा दौऱ्यावर बाहेर पडत असताना पुन्हा एक आत्महत्या झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल न उचलण्याची विनंती केली होती. तुम्हाला माझी शपथ आहे, जीवाचं बरवाईट करु नका" अशी कळकळीची विनंती त्यांनी केली होती. अशातच आता ही आत्महत्येची घटना समोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diksha bhoomi nagpur : दीक्षाभूमीत अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध; आंदोलकांकडून बांधकाम साहित्याची तोडफोड,VIDEO

Today Marathi News : MPSC मार्फत होणाऱ्या आजच्या परीक्षा TCS कडून रद्द

T20 World Cup: टीम इंडियानं वर्ल्डकप ट्रॉफी जिंकताच अजहरनं नवस फेडला! दर्ग्यापर्यंत अनवाणी चालत गेला!

Mukhyamantri Annpurna Yojana: काय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना? कोणाला, किती सिलिंडर मिळणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

VIDEO: स्टंटबाजी जिवावर बेतली! ताम्हिणी घाटात तरुण वाहून गेला, मित्रांच्या डोळ्यादेखत घडला थरार; घटना कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT