बीड : राज्याचे मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरून पक्षांतर्गत नाराजी समोर आली होती. यावर आज माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी पत्रकार परिषद घेऊन पडदा टाकलाय. बजरंग सोनवणे आणि त्यांचे समर्थक नाराज असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्या होत्या.
हे देखील पहा :
"सांगा बजरंग बप्पाचं काय चुकलं" असा पक्षश्रेष्ठींना प्रश्न विचारला गेला होता. त्यावर आज राष्ट्रवादीचे (NCP) माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी, बीडमध्ये (Beed) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केलीय. यावेळी ते म्हणाले, की चार साडेचार वर्षाच्या काळात लोकसभा निवडणूक लढलो, विधानसभेत 4 आमदार निवडून आणले. जिल्हा परिषद ताब्यात घेतली. मात्र नवीन जिल्हाध्यक्ष निवडताना आपण हजर नव्हतो आणि आपल्याला ही गोष्ट मिडियामधून समजली, असे त्यांनी सांगितले.
आपण राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज नाहीत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) साहेब हे माझे दैवत आहेत तर अजित दादा (Ajit Pawar) आणि मंत्री धनंजय मुंडे हे माझ्या हृदयात आहे. त्यामुळे नाराजीचा प्रश्न उद्भवत नाही. कार्यकर्ते आणि माझे समर्थक नाराज झाले आहेत, त्यांची समजूत कशी काढायची हे मला माहित आहे. असं बजरंग सोनवणे यांनी सांगितले.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.