beed assembly constituency independent candidate balasaheb shinde dies due to heart attack on election day 2024 
महाराष्ट्र

Beed Voting : हृदयद्रावक! मतदान केंद्रावरच तरुण उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Beed Election Voting : बीडमध्ये मतदान केंद्रावरच अपक्ष उमेदवाराचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Namdeo Kumbhar

Beed Election Voting : बीड विधानसभा मतदारसंघातून एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.. बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. (Balasaheb Shinde independent candidate from Beed passed away due to heart attack at polling place latest election news)

बाळासाहेब शिंदे हे बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत होते. यादरम्यान ते बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर थांबले होते. यादरम्यान त्यांना चक्कर आली अन् खाली पडले. त्यानंतर त्यांना बीड शहरातील काकू नाना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.. तिथून त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात देखील दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलंय. दरम्यान या दुर्दैवी घटनेने बीड शहरासह जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

विधानसभेच्या २८८ जागांसाठी राज्यभरात मतदान सुरु आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत फक्त ४५ टक्के मतदान झालेय. काही ठिकाणी राज्यात राडा झाल्याचे व्हिडीओ आणि तक्रारी आल्या. परळीमध्ये ईव्हीएम मशीन फोडल्याची घटनेमुळे बीड जिल्हा चर्चेत असतानाच आणखी एक दुर्देवी घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. बीड मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेमुळे बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मतदान केंद्रावर असताना बाळासाहेब शिंदे यांना छातीत दुखू लागले अन् चक्कर आली, त्यामुळे ते जमीनीवर कोसळले. तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. पण त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मतदानावेळीच उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे राज्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बीडमधील बाळासाहेब शिंदे यांचा दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मतदान केंद्रावरच मृत्यू झाला. बीड मतदारसंघात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिंदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Tourism: पालघरमधील 'या' प्रसिद्ध ठिकाणांना नक्की भेट द्या

Maharashtra exit Poll : महाराष्ट्रात पुन्हा महायुतीच! 'पोल'च्या झटक्यानं मविआची 'एक्झिट'

Maharashtra Exit Poll : सरस कोण, शरद पवारांची राष्ट्रवादी की अजित पवारांची? आश्चर्याचा धक्का देणारी एक्झिट पोलची आकडेवारी

Social Media : तुम्ही सोशल मीडियाचा वापर जास्त करता का? यामुळे होऊ शकते नुकसान..

MATRIZE Exit Poll : महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार, कुणाला किती जागा मिळणार ?

SCROLL FOR NEXT