beed ambajogai x
महाराष्ट्र

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Beed News : बीडमधील अंबाजोगाई येथे एका २० वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. सासरी पैशांसाठी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने स्वत:ला संपवले. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Yash Shirke

  • बीडमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस

  • पैशांसाठी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

  • अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात विवाहितेच्या पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Beed : बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमधील अंबाजोगाई येथील एका २० वर्षीय विवाहितेने सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. घरखर्चासाठी माहेरहून पैसे आणावेत यासाठी विवाहितेला सासरी सतत मारहाण आणि मानसिक छळ सुरु होता. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये विवाहितेच्या पतीसह सासरच्या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या २० वर्षीय विवाहितेचे नाव अनम शेख असे आहे. या प्रकरणी अनमचा भाऊ मुजफ्फर सिंकदर शेख यांने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, २००३ मध्ये गांधीनगर येथे राहणाऱ्या सोहेल अफसर शेख याच्याशी अनमचा निकाह झाला. तेव्हा माहेरच्या मंडळींनी सोन्याचे दागिने, संसारासाठी लागणाऱ्या गोष्टी दिल्या होत्या.

निकाह झाल्यानंतर काही महिन्यांनी अनमचा पती सोहेलला दारूचे व्यसन लागले. सोहेल आणि त्याच्या घरत्यांनी अनमचे दागिने मोडले. दागिने मोडल्यानंतर जे पैसे मिळाले, ते पैसे खर्च झाल्यानंतर अनमला मानसिक आणि शारीरिक छळ द्यायला सुरुवात झाली. अनमचा पती सोहेल, दीर मझहर आणि जाव तन्नो यांनी चारित्र्यावर संशय घेत अनमचा छळ केला.

परिस्थितीला कंटाळून अनमच्या पालकांनी मध्यस्थी केली. काही वेळेस तिच्या पतीला पैसेही दिले. पण हा छळ सुरुच राहिला. २६ जुलै रोजी सोहेलने अमनच्या आईकडे ३०,००० रुपयांची मागणी केली. सोहेल वेल्डिंगच्या दुकानासाठी पैसे मागत होता. पैसे न मिळाल्याने सोहेल संतापला. २७ जुलैच्या मध्यरात्री अमनच्या सासरकडच्या मंडळींनी तिच्या माहेरी फोन केला. अमनने विषारी औषध घेतल्याचे सासऱ्यांनी सांगितले. जेव्हा माहेरचे लोक रुग्णालयात पोहोचले. तेव्हा अमनने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

अमनच्या भावाच्या तक्रारीनंतर अमनचा पती सोहेल, दीप आणि जाऊबाई यांच्याविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सोहेल शेखला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय रवीकुमार पवार करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT