Beed Accident Saam tv
महाराष्ट्र

Beed Accident : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Beed News : दुचाकीला धडक दिल्यानंतर वाहनचालक वाहन घेऊन पसार झाला आहे. यामुळे कोणत्या वाहनाने दुचाकीला धडक दिली याबद्दल माहिती समजू शकलेली नाही

विनोद जिरे

बीड : बीड- सोलापूर महामार्गावरील पारगाव बायपासवर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात (Accident) दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सदरची घटना रात्री अकराच्या दरम्यान घडली (Beed) आहे. धडक देणारा वाहनचालक घटनेनंतर वाहन घेऊन पसार झाला आहे. (Latest Marathi News)

प्रभू किसन पिसाळ (वय ५७) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मयत प्रभू पिसाळ हे बीडच्या चौसाळा येथील ग्रामपंचायात कार्यालयात कर्मचारी म्हणून काम करत होते. ते दुचाकीवरून गावाकडे निघाले होते. यादरम्यान चौसळा परिसरातील पारगाव बायपासजवळ आल्यांनतर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात पिसाळ हे ठार झाले असून या प्रकरणी चौसाळा पोलिसांनी (Police) अपघाताची नोंद केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाहनचालक झाला फरार 

दुचाकीला धडक दिल्यानंतर वाहनचालक वाहन घेऊन पसार झाला आहे. यामुळे कोणत्या वाहनाने दुचाकीला धडक दिली याबद्दल माहिती समजू शकलेली नाही. या वाहनचालकाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT