Beed Accident News  Saam Tv
महाराष्ट्र

Beed Accident News : बीड-केज मार्गावर भीषण अपघात; माजी नगरसेवकाचा जागीच मृत्यू, पोलीस जमादार जखमी

भरधाव वेगात जाणाऱ्या स्विफ्ट कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.

विनोद जिरे

Beed Accident News : बीड जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या स्विफ्ट कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या भीषण अपघातात माजी नगरसेवकाचा जागीच मृत्यू झाला असून पोलीस जमादार गंभीर जखमी झाले आहे. ही दुर्देवी घटना केज -बीड या महामार्गावरील कोरेगाव शिवारात घडली. (Latest Marathi News)

गजमफर ऊर्फ पप्पू इनामदार असं अपघातात मृत्यू झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. तर सय्यद चाँद असं गंभीर जखमी असल्या पोलिस जमादाराचे नाव आहे. अपघातानंतर पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. माजी नगरसेवकाचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेक गजमफर ऊर्फ पप्पू इनामदार आणि केज ठाण्यातील जमादार सय्यद चाँद हे दोघे स्विफ्ट डिझायर कारने बीडकडे (Beed) जात होते. कोरेगाव शिवारात तांदळे वस्तीजवळच्या वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यालगतच्या खड्ड्यात जाऊन उलटली.

यादरम्यान कारने तीन ते चार वेळा उलटी. या अपघातात (Accident) गंजमफर ऊर्फ पप्पू इनामदार यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. अतिरक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी सय्यद चाँद हे जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाविकांचा टँकर महादेव डोंगराच्या दरीत कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू, २४ जखमी

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर, मुंबईसह राज्यात कोसळधारा, वाचा आज कोणत्या भागात IMD चा कोणता अलर्ट

Maharashtra Live News Update: लढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT