Beed Accident News Saam tv
महाराष्ट्र

Beed Accident News : मालवाहू गाडी- दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीवरील एका भावाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

Beed News : काम आटोपल्यानंतर ते दुपारी उमापूरकडे परतले होते. दरम्यान बोरी पिंपळगाव येथे समोरून मासे घेऊन येणाऱ्या पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली

विनोद जिरे

बीड : एकाच दुचाकीवरून गावाकडे जाणाऱ्या सख्खा भावांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या पिकअपने धडक दिली. या झालेल्या भीषण (Accident) अपघातात एका भावाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बीडच्या बोरी पिंपळगाव येथे २० एप्रिलला घडली आहे. (Tajya Batmya)

बीड (Beed) जिल्ह्यातील उमापूर येथील दादासाहेब भगवान सांगुळे (वय ३९) व उमाकांत भगवान सांगुळे (वय ४१) हे दोघे भाऊ कामानिमित्त गेवराईला गेले होते. काम आटोपल्यानंतर ते दुपारी उमापूरकडे परतले होते. दरम्यान बोरी पिंपळगाव येथे समोरून मासे घेऊन येणाऱ्या पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दादासाहेब सांगुळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर भाऊ उमाकांत सांगुळे गंभीर जखमी झाला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जखमी रुग्णालयात दाखल 

अपघात घडल्यानंतर गावातील नागरिकी मदतीला धावले. सदरच्या अपघातात गंभीर जखमी अवस्थेतील उमाकांतला पुढील उपचारासाठी (Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवले आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Special Offer: दिवाळीपूर्वी जिओची खास ऑफर! मोफत डेटा आणि कॉलिंगसह मिळतील अनेक फायदे, किंमत किती?

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी नाशिकमध्ये मोठी घडामोड, भाजप नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Maharashtra politics : ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात पुन्हा खिंडार, शिंदेंच्या शिवसेनेत अनेकांचा प्रवेश

Amravati Tourism : विदर्भात लपलाय ऐतिहासिक किल्ला, हिवाळ्यात करा ट्रेकिंगचा प्लान

Maharashtra Live News Update: घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना १० टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT