Beed विनोद जिरे
महाराष्ट्र

धुलिवंदनानिमित्त गाढवावरून जावयाची मिरवणूक काढण्याची तब्बल 90 वर्षांपासूनची परंपरा

कोविड 2 वर्षाच्या खंडानंतर यंदा जावई व गाढवाचा शोध सुरू

विनोद जिरे

बीड: गेल्या 90 वर्षापासून सुरू असलेली, बीडच्या विडा गावातील धुलीवंदनाची अनोखी परंपरा खंडित होते की काय? अशी शंका निर्माण होत आहे. कारण केज तालुक्यातील विडा गावात, जावयाला गाढवावरून होळीच्या दिवशी चपलांचा हार घालून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा जावयाच्या शोधा बरोबरच आता गाढवाचाही शोध गावकऱ्यांना (villagers) घ्यावा लागत आहे. (Beed A 90 year old tradition riding donkey)

हे देखील पहा-

मात्र, तरीही काहीही करू पण गाढवाचा (donkey) आणि जावयाचा शोध घेऊन धुलीवंदनाचा उत्सव थाटात साजरा करू म्हणत, गावकऱ्यांनी कंबर कसली आहे. धुलीवंदनाचा उत्सव साजरा करण्यासाठी विड्याच्या ग्रामस्थांची बैठक पार पडली आहे. जावायासह गाढवाच्या शोधासाठी गावकऱ्यांची शोधमोहीम सुरू आहे. विडा गावातील (village) नागरिकांच्या शोधामुळे जावई पसार झाले आहेत. केज तालुक्यातील विडा येथे गेल्या 90 वर्षा पासून जावयाला गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे.

मात्र, गेल्या 2 वर्षांपासून ही परंपरा कोरोनामुळे (corona) बंद ठेवण्यात आली होती. कोरोनामुळे सामाजिक, धार्मिक, राजकीय (Political), जवळपास सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. त्यामध्ये विड्याची प्रसिद्ध असणारी धुलीवंदनाच्या दिवशी जावयाला गाढवावरून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. यामुळे गेल्या २ वर्षात परिसरातील जावई व घरजावई यांना सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र, कोरोना आटोक्यात आल्यानंतर पुन्हा सर्वच कार्यक्रम सुरू झाले आहेत. त्यात पुन्हा जावई पसार होण्यास सुरुवात झाली आहे.

उद्या शुक्रवारी हा कार्यक्रम सकाळी 11 वा होणार आहे. दरम्यान गावकऱ्यांकडून जावई आणि गाढवाचा शोध सुरू आहे. कोविडच्या 2 वर्षानंतर आता गाढवावरून मिरवणूक काढण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे विडेकरांना आता जावाई आणि गाढव शोधात यश मिळणार का? आणि धुलिवंदनाची 90 वर्षापासून चालत आलेली परंपरा, अखंडित राहणार का? हेचं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT