Baramati Crime News Saam TV
महाराष्ट्र

धक्कादायक : वराह पालन करणाऱ्यांकडून महिलेला मारहाण; घटनेचा Video सोशल मीडियावर व्हायरल

ज्यांनी मारहाण केली आहे ते वराह पालनाचा व्यवसाय करीत असून वराह परिसरातील नागरिकांना त्रासदायक ठरत होते.

मंगेश कचरे

बारामती : बारामती (Baramati) शहरातील खंडोबा नगर परिसरात एका महिलेला मारहाण केल्याची घटना घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला आहे. वराह पालनावरून परिसरातील नागरिकांना त्रास होत होता.

यासाठी आज खंडोबा नगर येथे बैठक घेण्यात आली होती. या बैठकी दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांनी मारहाण केली आहे ते वराह पालनाचा व्यवसाय करीत असून वराह परिसरातील नागरिकांना त्रासदायक ठरत होते.

पाहा व्हिडीओ -

मारहाण झालेल्य़ा महिलेच्या अंगणात देखील वराह जात असल्याने या वराहाचा बंदोबस्त करावा यासाठी स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेकडे (Municipality) तक्रार देखील केली होती.

मात्र, हा विषय तेथेच मिटवण्याच्या दृष्टीने आज बैठक घेण्यात आली होती मात्र या बैठकी दरम्यानच मारहाण झाल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेने सांगितलं की , आज बोलाविण्यात आलेल्या बैठकीदरम्यान, वराह पालन करणाऱ्या लोकांनी आपणाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचं सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT