Shivsena mp vinayak raut criticises eknath shinde and devendra fadnavis, barsu refinery project saam tv
महाराष्ट्र

Barsu च्या माळरानावर रिफायनरी विरोधक धडकणार, माेठा पाेलिस फाैजफाटा तैनात; विनायक राऊत, राजू शेट्टींची जय्यत तयारी (पाहा व्हिडीओ)

आजच्या मोर्चाच्या अनुषंगाने पोलिसांचा मोठा फाैजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Siddharth Latkar

- अमाेल कलये / रणजीत माजगावकर

Barsu Refinery Latest News : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या (barsu refinery protests) विराेधात असणारे ग्रामस्थ आज (शुक्रवार) बारसूच्या माळरानावर मोर्चा काढणार आहेत. या माेर्चात खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांच्यासह शेतक-यांचे नेते राजू शेट्टी (raju shetti) हे सहभागी हाेणार आहेत. (Breaking Marathi News)

रिफानयरीच्या काही प्रमुख मुद्द्यांवर गुरुवारी (ता. 27) प्रशासनाने आंदाेलकांसह तज्ञांची राजापूरात (rajapur) एक बैठक घेतली. या बैठकीत स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे मुद्दे मांडले. यामध्ये आंबा बागायतदार आणि मच्छिमार यांनी देखील त्यांचे मुद्दे मांडले. या प्रकल्पामुळे आंबा आणि मच्छीमारीला कोणताही परिणाम होणार नसल्याचं उपस्थित तज्ञांनी ग्रामस्थांना सांगितलं.

या परिसरातील शैक्षणीक, आरोग्य आणि रोजगार याविषयी नेमकी भूमिका काय घेतली जाणार याविषयी देखील चर्चा करण्यात आली. समर्थकांनी प्रकल्प व्हावा अशी मागणी केली. बारसूमध्ये प्रस्तावीत असलेल्या रिफायनरी प्रकल्प (20 Million Metric Tonne Per Annum (MMTPA) इतक्या क्षमतेचा आहे. नाणार मधील साडेआठ हजार एकर जागा घेऊन (60 mmtpa) करावा आणि पुर्ण क्षमतेनं हा प्रकल्प करावा अशी मागणी बैठकीत उपस्थितांनी केली.

तर प्रकल्प विरोधकांनी प्रकल्पच नको अशीच भूमिका घेतली. पोलीस बळाचा वापर केला जातोय. दडपशाहीनं हा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला जात असल्यानं विरोधकांनी बैठकीत प्रशासनाचा निषेध केला. तसेच संपुर्ण जिल्ह्यात जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा प्रकल्प विरोधकांनी प्रशासनास दिला. या बैठकीस अविनाश महाजन (प्रकल्प समर्थक), महादेव गोठणकर (समर्थक), नंदकुमार मोहीते, प्रणाली राऊत (प्रकल्प विरोधक) आदी उपस्थित हाेते.

दरम्यान खासदार विनायक राऊत यांनी आज साम टीव्हीशी बाेलताना हा माझा मतदार संघ आहे. ग्रामस्थांच्या प्रत्येक गोष्टीला मी धावून जाणार. पोलीस अधीक्षकांना पुर्वसूचना देऊन मी आंदोलकाच्या भेटीला जाणार आहे.

कालच्या बैठकीला मीडियाच्या लोकांना परवानगी दिली गेली नाही. ऑफ कॅमेरा बोलणी का झाली ? असा सवाल विनायक राऊत यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात रिफायनरीबाबत मतांतर आहेत. त्यांनी भूमिका स्पष्ट करावी असेही विनायक राऊत यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT