Barsu Refinery Project /file photo Saam tv
महाराष्ट्र

Barsu Refinery Project: बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलकांना जामीन; कोर्टानं घातली महत्वाची अट

या प्रकरणात पोलिसांनी १६४ महिला आणि ३७ पुरुष ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आज कोर्टात हजर केल्यानंतर आंदोलकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर

Barsu Refinery News: बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरू असलेले आंदोलन सध्या चांगलेच चिघळले आहे. भर उन्हात आंदोलक महिला आणि पुरुषांनी या रिफायनरीचा विरोध केला. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला होता. या प्रकरणात पोलिसांनी १६४ महिला आणि ३७ पुरुष ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आज कोर्टात हजर केल्यानंतर आंदोलकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन आंदोलक आक्रमक झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज करत ताब्यात घेतले होते. या प्रकल्पामुळे राज्याचे राजकारणही चांगलेच तापले आहे. या प्रकल्पाच्या विरोधात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी स्थानिकांच्या बाजूने भूमिका घेतली आहे.

आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याची माहिती स्थानिकांनी दिली. बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतलेल्या आंदोनकर्त्या १६४ महिला आणि ३७ पुरुषांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोनलकांना आज कोर्टात सादर केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे . बारसू आंदोलक ग्रामस्थांची प्रत्येकी साडेसात हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आला आहे. तसेच कोर्टाने पुन्हा घटनास्थळी न जाण्याचे निर्देश दिले आहेत.

काय आहे बारसू रिफायनरी प्रकल्प?

भारत सरकारला महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर एक मेगा ऑइल रिफायनरी प्रकल्प उभारायचा आहे. २०१५ मध्ये, 'रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड' प्रकल्प रत्नागिरी, महाराष्ट्र येथे बांधला जाईल, अशी घोषणा करण्यात आली.यापूर्वी हा प्रकल्प रत्नागिरीतील नाणारमध्ये बांधण्यात येणार होता. मात्र शिवसेना आणि स्थानिक लोकांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होता.

पुढे महाविकास आघाडीचे सरकार आपल्यानंतर हा प्रकल्प नाणारऐवजी बारसू-सोलगावमध्ये (Barsu Refinery Project) उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला. शासनाच्या संमतीनंतर पुन्हा हा प्रकल्प होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र येथेही या प्रकल्पला स्थानिक विरोध करत आहे. येथे हा प्रकल्प होऊ नये म्हणून स्थानिक नागरिक मागील पाच दिवसांपासून आंदोलन करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील भोंदू बाबा आणि वेदिका पंढरपूरकर प्रकरणी मोठी अपडेट

Nashik Crime Bhushan Londhe: उत्तर प्रदेशातही 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला'; कुख्यात गुंडाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे सामना सुरू असतानाच भारतीय क्रिकेटपटूनं अचानक घेतला संन्यास, भावुक पोस्ट

Marathi Ukhane: लग्नात नववधुसाठी एकापेक्षा एक भन्नाट उखाणे

MMS Viral: १९ मिनिटांच्या व्हिडीओतील तरुणीची आत्महत्या? VIDEO मुळे सोशल मीडियावर खळबळ; नेमकं सत्य काय?

SCROLL FOR NEXT