Barsu Refinery Project  saam tv
महाराष्ट्र

Barsu Refinery Protest : गाेळ्या घाला, अंगावरुन गाडी न्या... मागे हटणार नाही; बारसूकरांचे सरकारला चॅलेंज (पाहा व्हिडीओ)

Barsu Refinery Protest News: दरम्यान या आंदाेलनाचे चित्रीकरण करणा-यांना देखील पोलिसांकडून हटकण्याचा प्रयत्न झाला.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर / अमाेल कलये

Ratnagiri News Update : बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्व्हेक्षणाला विराेध करणा-यांवर आज आंदोलनाचा दुस-या दिवशी पाेलिसांच्या बळाचा वापर सुरु झाल्याचे दिसून येत आहे. पाेलिस आणि आंदाेलकांमध्ये हमरीतुमरी हाेत असताना दिसून येत आहे. खून झाला तरी चालेल, मेलाे तरी चालेल आम्ही लढणार मागे हटणार नाही अशी भूमिका बारसू प्रकल्पाला विराेध करणा-या ग्रामस्थांनी घेतली आहे. (Breaking Marathi News)

यावेळी सर्व्हेक्षणाला आज महिलांनी तीव्र विराेध दर्शविला. आंदोलक पोलिसांच्या गाड्यांसमोर झोपले हाेतें. रस्त्यावर झोपून महिलांनी आंदोलन छेडले. पाेलिसांनी काही महिलांना ताब्यात घेतले आहे. यावेळी आंदोलनातील अनेक महिलांना तसेच आंदाेलकांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. महिलांनी रिफायनरी रद्द करण्याची मागणी लावून धरली. जाेपर्यंत रिफायनरी रद्द हाेत नाही ताेपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार महिलांनी व्यक्त केला.

दरम्यान या आंदाेलनाचे चित्रीकरण करणा-यांना देखील पोलिसांकडून हटकण्याचा प्रयत्न झाला. पाेलिसांनी अनेक माध्यमांच्या प्रतिनिधींना आंदाेलनस्थळापासून दूर राहा असे माईकवरुन पुकारले. त्यामुळे पत्रकारांना कव्हरेज करण्यासाठी देखील पाेलिसांनी मज्जाव केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आंदाेलकांनी अखेरच्या श्वासपर्यंत लढणार हीच भूमिका कायम ठेवली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

SCROLL FOR NEXT