Baramati News
Baramati News saam tv
महाराष्ट्र

Baramati News: धक्कादायक! मानेला धरलं, जमिनीवर आपटलं! बारामतीत भरदिवसा तरुणीला मारहाण, घटना CCTVत कैद

Chandrakant Jagtap

Baramati Crime : बारामतीमध्ये भर दिवसा एका तरुणाने तरुणीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. येथील सहयोग सोसायटीच्या गेटवर एका तरुणाने तरुणीला आधी हाताला धरून गेटपासून दूर नेलं आणि नंतर तिला मारहाण केली. या दरम्यान त्याने तिच्या मानेला धरून तिला जमिनीवर आपले. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

बारामती शहरातील सहयोग सोसायटी येथे तरुणी मेहंदी काढण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी तरुणाने तिचा विनयभंग केला आहे. तसेच तिला फरफटत घराबाहेर नेले आणि तिला मारहाण केले. यात ती तरुणी जखमी झाली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी सहयोग सोसायटी येथे मेहंदी काढण्यासाठी गेली होती. ही तरुणी ज्या घरात मेहंदी काढण्यासाठी गेली होती तिथे जाऊन तरुणाने तिला बाहेर बोलवून घेतले. त्यानंतर तू माझ्याबरोबर चल असे म्हणून तिचा हात पकडून तिला फरफटत बंगल्याच्या गेटच्या बाहेर नेले आणि माझ्याशी लग्न कर असा अग्रह केला.

त्यानंतर तो तिला पळवून नेण्याचा प्रयत्न करू लागला. तिछे त्याने तिच्या गालावरून हात फिरवून तू मला आवडते असे म्हणत पीडितेचा विनयभंग केला. तरुणीने त्याला विरोध केल्यानतंर त्याने तिला मानेला धरून जमीनीवर आपटलं. यात तरुणीच्या गुडघ्याला जखम झाली आहे. या तरुणाने तिला शिवीगाळ दमदाटी केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. (pune news)

या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या सहयोग सोसायटीच्या गेटवर या तरुणीला मारहाण झाली, त्या सोसायटीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं घर आहे. बारामती शहर पोलिसांनी भा.द.वि. 354, 354D, 323, 363, 504, 506 गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवणूक, खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक

Kalyan Lok Sabha | उमेदवारीचा गोंधळ, वैशाली दरेकरांची पहिली प्रतिक्रिया!

Money Tips: पैसे उजव्या हाताने का देतात? कारण वाचा

Mumbai Metro: मतदारांना विशेष सवलत; मतदानाच्या दिवशी मेट्रो तिकिटावर मिळणार १० टक्के सूट

Sanjay Nirupam : संजय निरुपम २० वर्षांनंतर पुन्हा शिवसनेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT