Parbhani News: बापलेक पाण्यात उतरले पण अनर्थ घडला! येलदरी धरण जलाशयात बुडून 16 वर्षीय मुलगा बेपत्ता; शोधकार्य सुरू

Parbhani News Update: अद्याप मुलाचा शोध लागला नसून अद्याप शोधकार्य सुरू आहे.
Parbhani News
Parbhani NewsSaamtv

राजेश काटकर, प्रतिनिधी...

Parbhani News: जिंतूर शहरालगत असलेल्या येलदरी जलशयात 16 वर्षीय मुलगा बुडल्याची घटना समोर आली आहे. रोहन कल्याणकर असे या मुलाचे नाव असून आज दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबद्दलची माहिती मिळताच घटनास्थळी प्रशासन आणि ग्रामस्थांनी पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध घेतला. मात्र अद्याप मुलाचा शोध लागला नसून अद्याप शोधकार्य सुरू आहे. (Latest Marathi News)

Parbhani News
Sushma Andhare News:'भंगार विकून खाणाऱ्यांना जागा दाखवून द्या...' महाडच्या सभेत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर शहरातील एकलव्य शाळा परिसरातील नामदेव नगर भागातील रहिवासी संजय कल्याणकर हे आपल्या कुटुंबासोबत सेनगाव हद्दीतील येलदरी रस्त्यावरील वन विभागाच्या उद्यानात फिरण्यासाठी गेले होते. उन्हाचा पारा चढल्याने गार्डन च्या बाजूला असलेल्या येलदरी जलशयात वडील संजय कल्याणकर व मुलगा रोहन कल्याणकर (वय 16 वर्ष) हे दोघं पाण्यात पोहत होते. यावेळी मुलगा खोल पाण्यात गेल्याने तो जलयशयाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाला. (Parabhani News)

Parbhani News
Nagpur Crime News: नागपूर हादरलं! ९ वर्षांच्या चिमुरडीवर बापाचा अत्याचार; नात्याला काळिमा फासणारी घटना

या घटनेची माहिती मिळताच, जिंतूर व सेनगाव पोलीसांना देताच पोलीस प्रशासन,व इतर प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दुपारी दीड ते सायंकाळ पर्यत वाजेपर्यंत प्रशासन आणि ग्रामस्थांच्या वतीने बेपत्ता मुलाचा शोध घेण्याचे कार्य सुरूच होते. येलदरी जलशयात प्रचंड पाणीसाठा असल्याने व रात्र झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com