Baramati News Saam tv
महाराष्ट्र

Baramati News : पुण्याच्या इंदापूरात रास्ता रोको; मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आंदोलन

Baramati News : मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे.

मंगेश कचरे

बारामती : मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहे. जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्याच्या इंदापूर शहरात जुन्या पुणे- सोलापूर मार्गावर बस स्थानकासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. 

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण (Maratha Aarkshan) देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. मनोज जरांगे हे सहाव्यांदा उपोषणाला बसले असून सरकार मात्र आरक्षणावर निर्णय देत नाही. यामुळे मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. याचा अनुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना समर्थन देण्यासाठी पुणे- सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

महामार्गावरील वाहतूक खोळंबळी 

रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. यावेळी एक मराठा लाख मराठा तुमच आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी इंदापूर पोलिसांच्या वतीने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shaha News : सत्ता स्थापनेच्या बैठकीत शरद पवार होते? अमित शहा यांचा मोठा खुलासा, पाहा Video

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराला पावणेतीन कोटींचे उत्पन्न; भाविकांमार्फत ६५३ ग्रॅम सोने व १३ किलो चांदी अर्पण

Peanut And Jaggery: थंडीमध्ये शेंगदाणे-गुळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

Tongue Taste Change: 'या' आजारांमुळे अचानक बदलते जीभेची चव; दुर्लक्ष करणं तुम्हाला पडेल महागात

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

SCROLL FOR NEXT