Baramati News Saam tv
महाराष्ट्र

Baramati News: वडिलांची आठवण जपण्यासाठी वाट्टेल ते..पालखी मार्गात येणारी इमारत उचलून घेणार नऊ फूट मागे

वडिलांची आठवण जपण्यासाठी वाट्टेल ते..पालखी मार्गात येणारी इमारत उचलून घेणार नऊ फूट मागे

मंगेश कचरे

बारामती : जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या भूसंपादनात दोन मजली इमारत जात आहे. परंतु, वडिलांच्या आठवणी जपण्यासाठी चक्क ही इमारत उचलून नऊ फूट मागे सरकवण्याचा प्रयोग पुणे (pune) जिल्ह्यातील बारामती (Baramati) तालुक्यातील काटेवाडी जवळ सुरू आहे. (Tajya batmya)

संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी महामार्गाच्या निमित्ताने एकीकडे भूसंपादन जोरात सुरू आहे. तर दुसरीकडे जुन्या रस्त्यातील झाडे काढली गेली आहेत. आता रस्त्याचे काम जसजसे जवळ येत आहे; तसतशी रस्त्याकडेची बांधकामे हटवली जात आहेत. काटेवाडीत मात्र एक नवीनच प्रयोग सुरू आहे. तसा तो प्रयोग इतरत्र वापरला जातो. मात्र या भागात नवीनच असल्याने त्याचे कुतूहल अधिक आहे.

काटेवाडीतील अकबर दादासाहेब मुलाणी यांची ३ हजार फूट दुमजली इमारत चक्क ९ फूट मागे सारली जाणार आहे. त्याचे काम गेल्या महिन्यापासून अव्याहतपणे सुरू आहे. आता हे काम पूर्णत्वास आले असून येत्या दोन दिवसांत ही इमारत पाच फूट उंच उचलून ९ फूट मागे घेतली जाणार आहे.

पाडण्यापेक्षा सरकावण्याचा खर्च कमी

इमारत रस्त्याच्या अगदी कडेला येत होती. पाठीमागे जागा शिल्लक होती. ही इमारत पाडायला देखील मोठा खर्च येत होता. नव्याने इमारत उभी करायची झाल्यास ५० लाख रुपये खर्च आला असता. मग यू ट्यूबवर सर्च केले आणि हरियाणातील या लोकांचा शोध लागला. मग या लोकांशी संपर्क साधला. त्यांनी १० लाख रुपये खर्च सांगितला आहे. इमारत पाडण्यापेक्षा ती मागे घेऊन त्याचा पुनर्वापर करता येणे शक्य असल्याने हा पर्याय निवडला. योगायोगाने पाठीमागे दहा फूट जागा शिल्लक असल्याने हे शक्य झाले असे मुलाणी यांनी सांगितले.

हरियाणातील ठेकेदाराला काम

हरियाणातून खास प्रशिक्षित ठेकेदाराला आणण्यात आले असून मोहनलाल नावाच्या या ठेकेदाराने आतापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली आदी राज्यांमधील १ हजारहून अधिक इमारती मागे घेतल्या आहेत. अथवा इतरत्र नेल्या आहेत. ज्या आडव्या इमारती होत्या, त्या सरळ करून दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: सरकारने काढलेला GR कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही: मुख्यमंत्र्यांचे विधान

Shirdi Sai Sansthan : साई मंदिर सुरक्षेसाठी आता AI चा वापर; साई संस्थानला तातडीने मिळणार गुन्हेगारांचा अलर्ट, डेटा होणार संग्रहित

Saiyaara OTT Release: थिएटर गाजवल्यानंतर अहान पांडे आणि अनीत पड्डाचा 'सैयारा' चित्रपट 'या' OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

Mumbai Metro 2: डायमंड गार्डन – मंडाले मेट्रो लवकरच धावणार, ५.३९ किमीचा मार्ग अन् ५ स्थानके; कधीपासून सुरू होणार?

बीडमध्ये चाललंय काय? वसतिगृहातील चिमुकल्यांना धुवायला लावले कपडे अन् बाथरूमची सफाई | VIDEO

SCROLL FOR NEXT