Baramati News Saam tv
महाराष्ट्र

Baramati News : पुरंदर सिंचन योजनेच्या कार्यालयातच पेटविली चूल; पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन 

Baramati News : गेल्या दीड महिन्यापासून पुरंदर सिंचन योजनेचे पाणी न मिळाल्याने सासवड येथे पुरंदर सिंचन योजनेच्या कार्यालयातच शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

मंगेश कचरे

बारामती : पाणी प्रश्न भेळसावत असल्याने पुरंदर सिंचन योजनेचे पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. पुरंदर (Purandar) सिंचन योजनेच्या कार्यालयातच महिलांनी स्वयंपाक करत हे आंदोलन केले असून पाणी मिळत नाही; तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी (Farmer) घेतली आहे. (Maharashtra News)

गेल्या दीड महिन्यापासून पुरंदर सिंचन योजनेचे पाणी न मिळाल्याने सासवड येथे पुरंदर सिंचन योजनेच्या कार्यालयातच शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये महिलांनी टीका कार्यालयात चूल पेटवून स्वयंपाक (Baramati) करण्यास सुरुवात केली आहे. गेली दीड महिन्यापासून या योजनेचे विद्युत पंपाचे दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र हे विद्युत पंप सुरू झाले, तरी पाणी न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हा आंदोलनाचा पवित्रा घेत आज थेट सिंचन योजना कार्यालयात दाखल झाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार 

कार्यालयात मोठ्या संख्येने शेतकरी व महिला आंदोलनासाठी दाखल झाले. पुरंदर सिंचन योजनेचे पाणी जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका महिलांनी आणि शेतकऱ्यांनी घेतली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT