Baramati Crime Saam tv
महाराष्ट्र

Baramati News: बारामतीत पोलिसच असुरक्षित? स्टंट करताना हटकल्याने तरुणाची सटकली, थेट पोलिसाच्या अंगावर घातली कार

Baramati Police: स्टंट करताना हटकल्यामुळे तरुणाने थेट पोलिसांच्या अंगावर कार घातली. या घटनेत पोलिस गंभीर जखमी झाला आहे. बारामती शहरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

Priya More

मंगेश कचरे, बारामती

बारामतीमध्ये रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱ्या कार चालकाकडून पोलिस हवालदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यावर स्टंटबाजी करतो म्हणून पोलिसांनी हटकलं त्यामुळे या तरुणाची सटकली. या तरुणाने थेट कार पोलिसाच्या अंगावर घातली. या घटनेत पोलिस हवालदार गंभीर जखमी झालेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.

रात्रीच्या वेळी रस्त्यावर स्टंट करणाऱ्या कार चालकाला पोलिसाने हटकले. त्यामुळे या तरुणाने बारामतीत एका पोलिस हवालदाराच्या अंगावर कार घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत बारामती तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार गंभीर जखमी झाला आहे. संतोष दत्तू कांबळे असं या जखमी पोलिस हवालदाराचे नाव आहे.

या प्रकरणी अज्ञात कार चालकावर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी पोलिस हवालदार कांबळे यांना बारामतीमधील भाग्यजय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.

बारामती शहरातील विद्या प्रतिष्ठानकडे जाणाऱ्या रस्त्यावर २९ मे रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे बारामतीमध्ये पोलिसच सुरक्षित नसल्याचे म्हटले जात आहे. या घटनेची गंभीर दखल घेत कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अवघ्या काही तासांत त्याला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT