Siddhi Hande
आई कुठे काय करते फेम अभिनेत्री अपूर्वा गोरे ही नेहमीच चर्चेत असते.
अपूर्वाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
अपूर्वाने इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.
अपूर्वा कॉलेजमध्ये असतानाच अभिनय करत होती. ती अनेक नाटकांमध्ये काम करायची.
अपूर्वाने नुकतेच सोशल मीडियावर काळ्या रंगाच्या खणाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहे.
अपूर्वाने कानात छान ऑक्साइड इअररिंग्स घातले आहेत. केस छान मोकळे सोडत फोटोशूट केले आहे.
अपूर्वाने या साडीला एक मॉडर्न ट्विस्ट दिला आहे. तिने साडीवर बेल्ट लावला आहे.
अपूर्वाची ही हटके स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.