Baramati Lok Sabha News: CCTV Is Off In Baramati's Godown Where Evm Machine Has Kept; Rohit Pawar's Reaction on It Saam TV
महाराष्ट्र

Baramati Lok Sabha: मोठी बातमी! बारामतीत EVM मशीन ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही बंद; आमदार रोहित पवार संतापले

Baramati Lok Sabha Election 2024 Voting News: बारामती लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं समोर आलं आहे. गेल्या ४५ मिनिटांपासून हे सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती आहे.

Satish Daud

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु असताना बारामतीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं समोर आलं आहे. गेल्या ४५ मिनिटांपासून हे सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती आहे. सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांना हा आरोप केला आहे.

काहीतरी काळंबेरं होण्याची शक्यता आहे, असा संशय देखील खाबिया यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडलं. त्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन स्ट्राँग रुमला जमा करण्यात आले आहेत. या EVM सीसीटीव्हीच्या निगरानीखाली ठेवण्यात आलेल्या आहेत.

कुठलाही गैरप्रकार घडू नये म्हणून प्रशासनाचे गोदामावर लक्ष आहे. मात्र, गोदामातील सीसीटीव्ही गेल्या ४५ मिनिटांपासून बंद असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी १० वाजून २५ मिनिटांपासून बंद पडलेलं आहे. मी त्या विभागाच्या अधिकाऱ्याला फोन लावला. पण त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. तिथे टेक्नीशियन देखील उपस्थित नाही, असं लक्ष्मीकांत खाबिया यांनी म्हटलं आहे.

यामध्ये काहीतरी काळंबेरं होण्याची शक्यता असू शकते, असा संशय देखील खाबिया यांनी व्यक्त केला आहे. हा प्रकार समोर येताच बारामतीत मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला आहे.

लोकशाहीला काळीमा फासणारी ही घटना आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. "आम्ही जेव्हा EVM मशीन त्या सेंटरला आणले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांना विनंती केली होती की, सीसीटीव्हीचा अॅक्सेस आम्हाला देण्यात यावा. पण त्यासाठी अधिकाऱ्यांनी दोन तीन दिवस लावले. आता अचानक सीसीटीव्ही बंद होणे हे लोकशाहीसाठी घातक आहे, आम्ही यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत", असं रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, इलेक्ट्रीक कामासाठी केबल काढल्यामुळे सीसीटीव्ही बंद असल्याचं स्पष्टीकरण आयोगाने दिलं आहे. तब्बल ४५ मिनिटानंतर सीसीटीव्ही पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT