Baramati Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Baramati Crime News: बारामती हादरली! ७५० रुपयांचा वाद...कोयत्याने १६ वार, वीज बिलाशी काय कनेक्शन?

Mahavitaran Female Worker Killed By Man: वीज बिल जास्त का आले? असा जाब विचारण्यासाठी आलेल्या तरुणाने महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने सपासप वार करत हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

Priya More

मंगेश कचरे, बारामती

बारामतीमध्ये (Baramati) महावितरणाच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वीज बिल जास्त का आले? असा जाब विचारण्यासाठी आलेल्या तरुणाने महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने सपासप वार करत हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. बारामतीच्या मोरगावमध्ये (Morgaon) ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वीज बिल जास्त का आले म्हणून जाब विचारण्यासाठी आलेल्या एका तरुणाने ३४ वर्षांच्या महावितरणाच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला. बारामतीच्या मोरगावमध्ये सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली. रिंकू बनसोडे असे या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. रिंकू कार्यालयात एकट्याच होत्या. अभिजीत पोटे हा तरूण रिंकूला वीज बिल जास्त आल्याचा जाब विचारत होता. यावेळी त्याने रिंकू यांच्यासोबत वाद घातला.

अभिजीत पोटेने यावेळी संतप्त होत रिंकू यांच्यावर कोयत्याने एकापाठोपाठ १६ वार केले. रिंकू यांच्या हात-पाय आणि तोंडावर आरोपीने वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या रिंकू यांना तात्काळ मोरगाव येथे प्रथमोपचार करत पुण्यातील सह्याद्री हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. पण उपचारादरम्यान दुपारी ३ वाजता रिंकू यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून मोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

रिंकू बनसोडे या मुळच्या लातूर शहरातील रहिवाशी होत्या. त्या विवाहीत होत्या. १० वर्षापूर्वी त्या महावितरणामध्ये सेवेत दाखल झाल्या होत्या. गेल्या १० वर्षांपासून त्या मोरगाव येथेच कार्यरत होत्या. नोकरीला लागल्यानंतर रिंकू बनसोडे यांचा विवाह झाला होता. त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे. या घटनेपूर्वी त्या १० दिवसांच्या सुट्टीवर होत्या. सुट्टीवरून त्या आजच कामावर रुजू झाल्या होत्या. रिंकू यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांना आणि महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबलं; नंतर महिलेला जागीच संपवलं, गावात उडाली खळबळ

लाडकी बहिणीचे पैसे मिळाले नाही, महिलांची e-KYC करण्यासाठी एकच झुंबड; अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Update: चालत्या कारमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपी फरार; कोरेगाव पार्क पोलिसांची शोधमोहीम सुरू

Weekly Horoscope: या राशींना मेहनतीचे चांगले फळ मिळेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Weight Loss: जिम न करता ३ महिन्यात करा वजन कमी रोज फॉलो करा ही ट्रिक

SCROLL FOR NEXT